"सचिन पिळगावकर हे माझे गुरु, ते लेजेंड आहेत" मराठी अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:53 IST2025-07-18T11:52:12+5:302025-07-18T11:53:34+5:30
अभिनेत्यानं दिग्गज कलाकार सचिन पिळगावकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

"सचिन पिळगावकर हे माझे गुरु, ते लेजेंड आहेत" मराठी अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना
Pushkar Jog On Sachin Pilgaonkar: पुष्कर जोग (Pushkar Jog) हा मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. पुष्कर अभिनयासोबतच निर्माता देखील आहे. त्याचे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षात रिलीज झाले आहेत. पुष्कर सोशल मीडियावर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतो. नुकतंच त्याने एका मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सचिन पिळगावकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. सचिन पिळगावकर हे त्याचे गुरु असल्याचं त्यानं सांगितलं.
'मराठी मूड' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पुष्कर जोग सचिन पिळगावकर यांच्यावर भाष्य केलं. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला सचिन पिळगावकर यांची कशी मदत केली, याबद्दल त्यानं सांगितलं. तो म्हणाला. "माझं करिअर हे मी एक डान्सर म्हणून सुरु केलं. तेव्हा पुण्यात परफॉर्म करायचो. तिथे डॉयरेक्टर, प्रोड्यूसर यायचे. मला अभिनयाबद्दल काहीच माहिती नव्हतं. मी कधीच कॅमेरा फेस केला नव्हता. मी खरं सांगू का जेव्हा मी बालकलाकार म्हणून काम सुरू केलं, तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर माझी भेट सचिन पिळगावकर यांच्याशी झाले. तेच माझे गुरु आहेत. ते एक "इंस्टिट्यूट" आहेत, लेजेंड आहेत".
सचिन पिळगावकर यांच्यामुळे चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचं पुष्करने नमूद केलं. तो म्हणाला, "मी सचिन पिळगावकर यांना जेव्हा भेटलो, तेव्हा त्यांनी मला खूप काम दिलं. तब्बल तीन वर्ष त्यांनी मला काम दिलं. त्याचा "आज़माइश" हा चित्रपट मी केला. तिथे मी धर्मेंद्र यांच्याबरोबर काम केलं. त्यानंतर 'हम दोनों', 'ऐसी भी क्या जल्दी है', 'तू तू मैं मैं'मध्ये काम केलं", असं पुष्कर म्हणाला.