'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात सिद्धार्थ बोडकेला महाराजांच्या रुपात पाहून मराठी अभिनेत्याला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:13 IST2025-11-01T15:12:37+5:302025-11-01T15:13:40+5:30
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत असून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. सिद्धार्थ बोडकेचा अभिनय पाहून मराठी अभिनेता भारावून गेला आहे.

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात सिद्धार्थ बोडकेला महाराजांच्या रुपात पाहून मराठी अभिनेत्याला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ
बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमातून शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर विषयाला हात घातला आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत असून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. सिद्धार्थ बोडकेचा अभिनय पाहून मराठी अभिनेता भारावून गेला आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचा खास प्रिमियर शो आयोजित करण्यात आला होता. या शोला सिनेजगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सिनेमात सिद्धार्थ बोडकेचा अभिनय पाहून अभिनेता नयन जाधव भारावला आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' पाहिल्यानंतर अभिनेत्याला अश्रू अनावर झाले आहेत. याचा व्हिडीओ समोर आला आहे. नयन जाधव रुमालाने अश्रू पुसताना दिसत आहे. कोहिनूर मराठी मीडिया या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात सिद्धार्थ बोडकेसोबत सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शिंदे, विक्रम गायकवाड, रोहित माने, पृथ्विक प्रताप, बालकलाकार भार्गव जगताप आणि त्रिशा ठोसर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर सिद्धार्थ जाधवने खलनायकाची भूमिका साकारली आहे. ३१ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसादही मिळत आहे.