जस्ट लुकिंग लाईक अ Wow! प्रिया बापटचं जबरदस्त वर्कआऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 19:07 IST2023-11-08T19:07:04+5:302023-11-08T19:07:49+5:30
मराठीसह बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रिया अगदी फिटनेसवेडी आहे.

जस्ट लुकिंग लाईक अ Wow! प्रिया बापटचं जबरदस्त वर्कआऊट
कामाचा भाग म्हणून फिटनेस जपण्यासाठी किंवा फिगर मेंटेन ठेवण्यासाठी अभिनेत्रींना प्रयत्न करावेच लागतात. पण त्यातही अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या फिटनेसबाबत, व्यायामाबाबत खूपच जास्त सतर्क असतात. अगदी काहीही झालं तरी त्यांचं रोजचं व्यायामाचं रुटीन काही बदलत नाही. अशा अभिनेत्रींपैकी एक आहे प्रिया बापट.
मराठीसह बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रिया अगदी फिटनेसवेडी आहे. आपल्याप्रमाणेच आपल्या चाहत्यांनीही फिट रहावं, असं तिला मनापासून वाटतं. त्यामुळेच ती चाहत्यांना फिटनेस मोटीव्हेशन देत असते. ती नेहमीच फिट राहण्यासाठी व्यायाम करते. एवढंच नाही तर ती याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर करते. यामध्येच आता तिचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
प्रियानं वर्कआउट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये असलेले 'जस्ट लुकिंग लाईक अ वॉव' हा डायलॉगही जोडला आहे. या व्हिडीओमध्ये ती जीममध्ये असून हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे. यावेळी तिची फिटनेस ट्रेनरही दिसून येत आहे.
प्रिया ही मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री आहे. बाबासाहेब आंबेडकर , भेट, मुन्ना भाई M.B.B.S, लगे राहो मुन्ना भाई, आनंदी आनंद, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, टाईम प्लीज, आंधळी कोशिंबीर, हॅपी जर्नी, वजनदार, टाईमपास 2 या चित्रपटांमध्ये प्रियानं आपल्या अभिनयाची छाप पाडली.शिवाय '..आणि काय हवं' या वेबसीरिजच्या माध्यमातूनही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी-हिंदी चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्म, विविध कलाकृतींची निर्मिती, कपड्यांचा ब्रँड हे सगळं सांभाळत असताना ती रंगभूमीवरदेखील कार्यरत आहे.