Priya Bapat : 'आई, तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण' प्रिया बापटने लिहिली भावूक कविता; वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:56 PM2023-01-18T12:56:28+5:302023-01-18T12:57:36+5:30

आईच्या आठवणीत प्रिया बापट भावूक झाली आहे.

priya bapat shared emotional poem for late mother says life is incomplete without you | Priya Bapat : 'आई, तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण' प्रिया बापटने लिहिली भावूक कविता; वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Priya Bapat : 'आई, तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण' प्रिया बापटने लिहिली भावूक कविता; वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

googlenewsNext

Priya Bapat : मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापटने नुकतीच आईसाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. प्रिया बापटच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. अनेकदा तिच्या पोस्ट मध्ये तिला आईची किती आठवत येते हे जाणवतं. आता तिने इंग्रजीत एक भावूक कविता लिहिली आहे जी वाचून सर्वांच्याच डोळ्यात पाणी येईल. तसेच यासोबत तिने आईसोबतचा एक छानसा फोटोही जोडला आहे.

या पोस्ट मध्ये प्रिया बापट लिहिते, 

प्रिय आई,

मला एक फुलपाखरू दिसलं आणि मला माहित आहे की ते तूच आहेस.
मला एक फूल दिसलं आणि मी तुला पाहते.
तुझे निसर्गावर किती प्रेम होते हे मला माहीत आहे.
आणि म्हणूनच देवाने त्याच्यासोबत नेण्यासाठी तुझीच निवड केली.

तू गेल्यानंतर आमच्यासाठी जगणं सोप्पं नव्हतं 
पण तू म्हणायचीस जीवन हे वर्तुळ आहे आणि एखाद्याला पुढे जावेच लागते.

तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे पण अशावेळी मी तुझ्या लढाऊ वृत्तीचा विचार करते, वेदनांमध्ये तुझं हसणं,लोभाविना तुझ्या चेहऱ्यावर येणारं हसू याबद्दल मी विचार करते.
आणि मी उठते.
मी पुन्हा जगण्यासाठी उठते,
कठोर परिश्रम करण्यासाठी आणि मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी,
तुझं प्रेम नेहमीच माझ्या सोबत आहे.

ते म्हणतात तू आता एक तारा बनली आहेस
आणि तू आमच्या सर्वांच्यावर लक्ष ठेवून आहेस 
आईकडे नेहमीच एक सुपरपॉवर असते पण आता तुझ्याकडे जादूची कांडी आहे,
मग मी काळजी का करावी? मी नाही. अजिबात काळजी करणार नाही.



प्रियाची ही कविता वाचून सर्वांनाच भावूक वाटत आहे. मराठी कलाकारांनी  तिच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. प्रिया नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे वर्कआऊट चे व्हिडिओ फोटो शेअर करत असते. प्रिया लवकरच एका वेब सिरीज मध्येही दिसणार आहे ज्याचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे.

Web Title: priya bapat shared emotional poem for late mother says life is incomplete without you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.