कपड्यावर आणि हातातही महाराज! पृथ्विक प्रतापच्या घड्याळाने वेधलं लक्ष, किंमत पाहून झोप उडेल
By कोमल खांबे | Updated: October 31, 2025 17:34 IST2025-10-31T17:33:37+5:302025-10-31T17:34:04+5:30
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातून शेतकरी आत्महत्यासारख्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पृथ्विकने खास लूक केला होता. याचे फोटो त्याने सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

कपड्यावर आणि हातातही महाराज! पृथ्विक प्रतापच्या घड्याळाने वेधलं लक्ष, किंमत पाहून झोप उडेल
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्विक प्रताप 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात पृथ्विकने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातून शेतकरी आत्महत्यासारख्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पृथ्विकने खास लूक केला होता. याचे फोटो त्याने सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.
फोटोमध्ये पृथ्विकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातल्याचं दिसत आहे. त्याच्या कपड्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमासाठी हा खास कुर्ता पृथ्विकने डिझाइन करून घेतला आहे. पण लक्ष वेधून घेतलंय ते त्याने हातात घातलेल्या घड्याळाने. पृथ्विकने घातलेलं हे घड्याळ खूप खास आहे. या घड्याळाची डाय ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची आहे. पृथ्विकने घातलेलं हे घड्याळ 'जयपूर वॉच कंपनी'चं आहे. याची किंमत तब्बल ६५ हजार रुपये इतकी आहे.
"‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ रयतेच्या राजाचा सिनेमा आजपासून रयतेला समर्पित. शेवटच्या श्वासांपर्यंत माझ्या राजांना छातीवर सुद्धा मिरवणार! आणि त्यांचे विचार आचरणात सुद्धा आणणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर महादेव", असं कॅप्शन पृथ्विकने या फोटोंना दिलं आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा सिनेमा महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सिद्धार्थ बोडके, सिद्धार्थ जाधव, त्रिशा ठोसर, मंगेश देसाई हे कलाकार आहेत.
