लय खतरनाक! मुळशीच्या शेतात प्रविण तरडे करत्यात निराळे प्रयोग, लावलंय सफरचंदाचं झाड, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:53 IST2025-07-15T13:53:37+5:302025-07-15T13:53:55+5:30
अभिनेता असण्याबरोबरच प्रविण तरडे शेती कामातही विशेष लक्ष घालताना दिसतात. असाच एक व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ते शेतात काम करताना दिसत आहेत. या मुळशीच्या शेतात त्यांनी काश्मिरमध्ये पिकणाऱ्या सफरचंदाचं झाडंही लावलं आहे.

लय खतरनाक! मुळशीच्या शेतात प्रविण तरडे करत्यात निराळे प्रयोग, लावलंय सफरचंदाचं झाड, म्हणाले...
प्रविण तरडे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. अनेक दमदार सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. अभिनेता असण्याबरोबरच प्रविण तरडे शेती कामातही विशेष लक्ष घालताना दिसतात. असाच एक व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ते शेतात काम करताना दिसत आहेत. या मुळशीच्या शेतात त्यांनी काश्मिरमध्ये पिकणाऱ्या सफरचंदाचं झाडंही लावलं आहे.
प्रविण तरडे व्हिडीओत म्हणतात, "२-३ वर्षांपूर्वी एक प्रयोग केला होता. हे सफरचंदाचं झाड आहे. मुळशी तालुक्यात सफरचंद...आजपर्यंत असा प्रयोग झालेला नाही. पण, आम्ही सफरचंदाची काही झाडं आणून आमच्या वेगवेगळ्या शेतात लावली होती. म्हणजे हा आमच्या गावाचा खालचा भाग आहे जिथे आम्ही भातशेती करतो. या शेतीच्या बांधावर आम्ही झाडं लावली होती. आणि काही झाडं रानात लावली होती. त्यातलं एक झाड व्यवस्थित जगलं, टिकलं आणि मोठं झालं आहे. सफरचंद येतील नाही येतील हा पुढचा भाग. पण, हा प्रयोग जर यशस्वी झाला तर काहीतरी एक वेगळा प्रयोग करण्याचा आमचा प्लॅन आहे".
दरम्यान, प्रविण तरडेंनी 'देऊळ बंद', 'मुळशी पॅटर्न', 'सरसेनापती हंबीरराव', 'धर्मवीर' अशा सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. याशिवाय समाजातील घडामोडींवरही ते बेधडकपणे त्यांचं मत मांडताना दिसतात.