'तुला स्टेजवर येऊन मारेन'; सगळ्यांसमोर उपेंद्र लिमयेंनी दिली होती प्रवीण तरडेंना 'धमकी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 10:41 AM2023-08-09T10:41:45+5:302023-08-09T10:45:54+5:30

Pravin tarde: 'तुझी कुवत कळते का काय आहे? असं म्हणूनही उपेंद्र यांनी प्रवीणला फटकारलं होतं.

pravin-tarde-share-old-memories-about-upendra-limaye | 'तुला स्टेजवर येऊन मारेन'; सगळ्यांसमोर उपेंद्र लिमयेंनी दिली होती प्रवीण तरडेंना 'धमकी'

'तुला स्टेजवर येऊन मारेन'; सगळ्यांसमोर उपेंद्र लिमयेंनी दिली होती प्रवीण तरडेंना 'धमकी'

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये (upendra limaye) आणि प्रवीण तरडे (Pravin tarde). आपल्या स्वकर्तृत्वाच्या बळावर या दोन्ही कलाकारांनी सिनेसृष्टीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं. या दोघांची मैत्री जगजाहीर आहे. हे दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र असून त्यांच्या मैत्रीचे किस्से कायम रंगत असतात. अलिकडेच या दोघांनी बोल भिडू या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. यात एकदा सगळ्यांसमोर उपेंद्र लिमयेने प्रवीण तरडेंना चक्क मारायची धमकी दिली होती.

उपेंद्र लिमये आणि प्रवीण तरडे यांनी अनेक नाटक, मालिका, सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे त्यांची मैत्री आज झालेली नाही. करिअरच्या सुरुवातीपासून ते एकमेकांचे मित्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मैत्रीचे अनेक किस्से आहेत. यात एकदा प्रवीण तरडेंना स्टेजवर पाहिल्यावर उपेंद्र लिमये प्रचंड संतापले होते. इतकंच नाही तर 'तुला पुन्हा स्टेजवर पाहिलं तर मारेन', असंही म्हटले होते. हा किस्सा प्रविण तरडे यांनी सांगितला.

"माझी शेवटची एकांकिका होती. या एकांकिकेने बीडमध्ये करंडक जिंकलं होतं. त्यावेळी उपेंद्र तिथे प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. मला बघून याचं डोकंच फिरलं. 'तू अजून एकांकिका करतोयेस? 'असा प्रश्न त्याने  विचारला. त्यावर, अरे, हे करुनच मला आनंद मिळतो ना असं उत्तर मी दिलं. पण, त्यावर तो चांगलाच खवळला. 'तुझी कुवत कळते का काय आहे? तू चित्रपट, व्यावसायिक नाटकं केली पाहिजेत", असं उपेंद्र म्हणाल्याचं प्रविण तरेंडनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "मी पुन्हा एकदा अरे मला एकांकिकाच करायला आवडतात असं सांगितलं. त्यावर त्याने मला पकडलं आणि जर तू मला आता कुठल्या स्पर्धेमध्ये दिसलास ना, तर पव्या तुला स्टेजवर असताना येऊन मारीन. त्यामुळे आता थांबव हे एकांकिका वगैरे करणं आणि समुद्रात उडी मार, असं म्हणाला. त्यावेळी अरविंद जगताप सुद्धा तिथे होते."

दरम्यान, उपेंद्र लिमये व प्रविण तरडे यांच्या‘आणीबाणी’ हा चित्रपट  नुकताच  प्रदर्शित झाला. दिनेश जगताप यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद याची जबाबदारी अरविंद जगताप यांनी सांभाळली आहे.
 

Web Title: pravin-tarde-share-old-memories-about-upendra-limaye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.