प्रवीण तरडे आणि त्यांच्या कलाकार पत्नीने लंडनमध्येही जपली मराठी संस्कृती, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:24 IST2022-07-18T16:02:50+5:302022-07-18T16:24:38+5:30
Praveen Tarde : लंडन दौऱ्यादरम्यान प्रवीण तरडे त्यांच्या पत्नीसह मरोठमोळ्या लूकमध्ये नाटक पाहायला पोहोचले. त्यांचा हा व्हिडीओ समोर येताच नेटकरी कौतुक करतायेत.

प्रवीण तरडे आणि त्यांच्या कलाकार पत्नीने लंडनमध्येही जपली मराठी संस्कृती, म्हणाले....
धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव या चित्रपटातून अभिनेता, दिग्दर्शक, लेख प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
सध्या प्रवीण पत्नीसोबत लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. त्यादरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे ते लंडनमध्ये ही भारतीय संस्कृती जपतायेत. लंडन दौऱ्यादरम्यान प्रवीण तरडे त्यांच्या पत्नीसह मरोठमोळ्या लूकमध्ये नाटक पाहायला पोहोचले. यादरम्यानचा त्यांनी एक व्हिडीओ फेसबुक अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
लंडनला आल्यावर नाटक पाहिलं नाही तर मग मजा नाही. त्यात नाटक जर लायन किंग असेल तर डबल धमाका...असं कॅप्शन त्यानी या व्हिडीओसोबत दिलं आहे. नाटक पाहायला जायचं म्हणजे पारंपरिक वेशभूषा छान पाहिजे. आपण कुठून आलो आहोत हे इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे असे ते या व्हिडीओ सांगतायेत. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीने मराठमोळी साडी आणि त्यावर गजरा माळला आहे.
प्रवीण तरडे यांची पत्नीदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये स्नेहल तरडे यांनी लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारली आहे. स्नेहल यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबत काही नाटकात काम केलं आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला आहे.