प्रार्थनाने नाकारलेला अनुराग बसूंचा सिनेमा, किस्सा सांगत म्हणाली, "त्यांनी मला पाहताच... "

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:43 IST2024-07-30T16:42:02+5:302024-07-30T16:43:48+5:30

एंटरटेन्मेंट रिपोर्टर ते हिरोईन, असा आहे प्रार्थनाचा प्रवास

Prarthana Behere once rejected Anurag Basu s film he told her to start acting | प्रार्थनाने नाकारलेला अनुराग बसूंचा सिनेमा, किस्सा सांगत म्हणाली, "त्यांनी मला पाहताच... "

प्रार्थनाने नाकारलेला अनुराग बसूंचा सिनेमा, किस्सा सांगत म्हणाली, "त्यांनी मला पाहताच... "

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) नुकतीच 'बाई गं' सिनेमात झळकली. प्रार्थना आधी पत्रकार होती हे खूप कमी जणांना माहित असेल. ती आधी हिंदी चॅनलमध्ये एंटरटेन्मेंट न्यूज रिपोर्टिंग करायची. यानिमित्ताने ती सेलिब्रिटींच्या मुलाखती घ्यायची. एक दिवस ती स्वत: सेलिब्रिटी बनेल याची तेव्हा तिने कल्पनाही केली नव्हती. 'बर्फी' फेम दिग्दर्शक अनुराग बसू यांनी तिला तू हिरोईन असायला पाहिजे असं म्हटलं होतं. याची आठवण प्रार्थनाने नुकतीच एका मुलाखतीत सांगितली.

प्रार्थना बेहेरेने तिच्या अभिनयातील प्रवासाची सुरुवात हिंदीतून केली होती. 'पवित्र रिश्ता' या गाजलेल्या मालिकेत ती झळकली. नुकतंच प्रार्थनाने 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, "मी पत्रकारिता करायचे तेव्हा एकदा काईट या हिंदी सिनेमाचं कास्टिंग सुरु होतं. या निमित्ताने मी दिग्दर्शक अनुराग बसू यांची मुलाखत घेण्यासाठी गेले. तेव्हा ते मला पाहताच म्हणाले की अरे तू तर अभिनय करायला पाहिजे. तू अभिनयात ये. तेव्हा मी त्यांना म्हणाले की नाही सर, मी रिपोर्टिंगमध्येच बरी आहे. आता मी असा विचार करते की का मी तेव्हा नाही म्हणाले. इतकंच नाही तर ते मला सिनेमात एक भूमिकाही देत होते. मी त्यांना तरी सरळ नाही म्हणलं."

ती पुढे म्हणाली, "पुढे काही वर्षांनी जेव्हा अनुराग बसूंनी मला पवित्र रिश्तामध्ये बघितलं तेव्हा ते मला समोरुन म्हणाले, आता काय करतेय तू? तेच तर करतेय जे मी तुला तेव्हाच करायला सांगितलं होतं. अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला मिळत होत्या पण केल्या नाही. आता त्याचा पश्चात्ताप होतोय असं नाही म्हणणार कारण आता जे आहे तेही चांगलं आहे. पण तेव्हा त्या गोष्टी केल्या असत्या तर आयुष्य अजून काहीतरी वेगळं असतं."

Web Title: Prarthana Behere once rejected Anurag Basu s film he told her to start acting