ऐकावं ते नवलच ! प्राजक्ता माळीने परिधान केला नाचणीचे पापड लावलेला ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 06:30 IST2020-02-04T06:30:00+5:302020-02-04T06:30:00+5:30
प्राजक्ताच्या नाचणीचे पापड लावलेल्या ड्रेसचे फोटो एकदा पहाच

ऐकावं ते नवलच ! प्राजक्ता माळीने परिधान केला नाचणीचे पापड लावलेला ड्रेस
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. आपल्या पर्सनल लाईफ आणि तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात.
प्राजक्ता माळी हिने नुकताच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने म्हटलंय की, नाचणीचे पापड लावलेला ड्रेस - समीर चौघुले. दादा असे का म्हणाला हे फोटो स्वाईप केल्यावर समजेल.
नाचणीचे पापड लावलेला ड्रेस वाचल्यावर तुम्ही गोंधळात पडला असाल ना. खरेतर प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोत तिच्या ड्रेसला खालच्या बाजून गोल आकाराचे डिझाईन करण्यात आलं आहे. या डिझाईनला समीर चौघुलेने नाचणीचे पापड असे संबोधले आहे. या गेटअपमध्ये प्राजक्ता खूप छान दिसते आहे.
प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.