लॉकडाऊनमध्ये या मराठी अभिनेत्रीने शेअर केला साडीतला थ्रो बॅक फोटो, फॅन्स झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 12:09 IST2020-04-22T11:29:12+5:302020-04-22T12:09:57+5:30
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा तिच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

लॉकडाऊनमध्ये या मराठी अभिनेत्रीने शेअर केला साडीतला थ्रो बॅक फोटो, फॅन्स झाले फिदा
सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ अगदी आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही प्राजक्ता माळी आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.
प्राजक्ताने इंस्टाग्रामवर साडीतला खिडकीसमोर बसलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिचा अंदाज कोणालाही घायाळ करेल असाच आहे. या फोटोत प्राजक्ता खूपच सुंदर दिसते आहे. प्राजक्ताचा हा फोटो जुना आहे. फोटोत सोबत तिने थ्रो बॅक असा हॅशटॅग दिला आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर 55 हजाराहुन अधिक लाईक्स आले आहेत. सोशल मीडियावर तिच्या या फोटोवर कमेंट्सचादेखील वर्षाव सुरु आहे. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.