प्राजक्ता माळीचे काय आहेत नवी वर्षातील प्लान ? केलाय खास संकल्प, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:59 IST2024-12-20T14:58:51+5:302024-12-20T14:59:08+5:30
प्राजक्ता माळीने नवीन वर्षाचे काही खास प्लान बनवले आहेत. तर ते काय आहेत जाणून घेऊया.

प्राजक्ता माळीचे काय आहेत नवी वर्षातील प्लान ? केलाय खास संकल्प, जाणून घ्या...
Prajakta Mali 2025 Resolution : नव्या वर्षाची सुरुवात होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधी अनेक जण नवीन वर्षाचे संकल्प (New Year 2025) करतात. हे संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील लोक करतात. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीनंदेखील (Prajakta Mali ) नवीन वर्षाचे काही खास प्लान बनवले आहेत. तर ते काय आहेत जाणून घेऊया.
प्राजक्तानं नुकतंच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी तिनं विविध विषयावर भाष्य केलं. नवीन वर्षांचे प्लान आणि रिझोल्यूशनवर ती बोलली. प्राजक्ता म्हणाली, "माझं निर्माती होणं हे स्वप्न नव्हतं. हे मी कधीच ठरवलं नव्हतं. माझ्या वाटल्याला माझं कौशल्य दाखवता येईल, असे प्रोजेक्ट आले नाही. म्हणून मला हे करावं लागलं. तर आता मला असं वाटतं की आता मी माझ्यातील प्रतिभा दाखवली आहे. तर आता माझ्याकडे चांगले प्रोजक्ट यावेत. मला वैविध्यपुर्ण भुमिका याव्यात. मला खूप काम करायचं आहे".
पुढे ती म्हणाली, "माझा पहिल्यापासून हा उद्देश राहिलाय की मी माझ्या आवडत्या गोष्टीमधून कष्ट करून कमवावेत, जसं दागिणे मॉडलिंग. आता २०२५ मध्ये माझा उद्देश आहे की, मी जे पैसे कमवेन ते मला अभिनयातून यावेत. आता मला प्रोड्यूस करायचं आहे. मला इतर भाषांमध्ये काम करायचं आहे. वेगवेगळ्या डायरेक्टर्ससोबत काम करायचं आहे. वेगवेगळ्या जॉनरमध्ये काम करायचं आहे. असचं माझं २०२५ असावं, अशी माझी पार्थना आहे देवाकडे". प्राजक्ताच्या नवीन वर्षाचे प्लान ऐकून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच प्रदर्शित झालेल्या तिच्या 'फुलवंती' या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलचं गाजवलं. सध्या प्राजक्ता 'फुलवंती' सिनेमाचं यश एन्जॉय करत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात ती अभिनेत्री असण्यासोबतच निर्मितीही होती. तसेच नुकतंच तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कार जाहीर झाला आहे.