यंदा कर्तव्य आहे ! म्हणत लग्नबंधनात अडकणार ही मराठमोळी अभिनेत्री, लग्नाचे दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 09:58 IST2020-06-12T09:55:57+5:302020-06-12T09:58:38+5:30

आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

Prajakta Mali Plan to tie the knot next year 2021 | यंदा कर्तव्य आहे ! म्हणत लग्नबंधनात अडकणार ही मराठमोळी अभिनेत्री, लग्नाचे दिले संकेत

यंदा कर्तव्य आहे ! म्हणत लग्नबंधनात अडकणार ही मराठमोळी अभिनेत्री, लग्नाचे दिले संकेत

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. 

चित्रटसृष्टीत बऱ्याच जणांचं लग्न झालंय, काही जण एन्गेज आहेत तर काही जण आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत. याच यादीत आता प्राजक्ता माळीचेही नाव गणले जाणार आहे. गेल्या अनेकवर्षापासून  प्राजक्ताचे आई- वडिल प्राजक्ताला लग्न करण्यासाठी सांगतायेत. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांची झालीत. त्यामुळे आपल्यालाही लग्न कधी करणार अशी विचारणा होऊ लागल्याची प्रांजळ कबुली तिने दिली आहे.  एखादा चांगला मुलगा कुणी आयुष्यात आला तर लग्न करु असंही तिने सांगितले आहे. 

मात्र सध्या तरी आपण सिंगल आहोत हे सांगायलाही ती विसरली नाही. आयुष्याचा साथीदार निवडण्याची जबाबदारी तिने तिच्या आई- वडिलांवरच सोपवली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्यासाठी स्थळं शोधण्याचे काम सुरु  असल्याचे तिने सांगितले. तसेच चांगले स्थळ आलेच तर २०२1 वर्षात ती लग्न करणार असल्याचे तिने सांगितले आहे.

Web Title: Prajakta Mali Plan to tie the knot next year 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.