'फुलवंती'ची चौथ्या दिवशी कमाई घटली, प्राजक्ता माळीच्या सिनेमाने आत्तापर्यंत कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 11:52 IST2024-10-15T11:44:39+5:302024-10-15T11:52:51+5:30

'फुलवंती' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. चौथ्या दिवशी या सिनेमाची कमाई घटल्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे सांगत आहेत.

prajakta mali phulwanti marathi movie box office collection day 4 details | 'फुलवंती'ची चौथ्या दिवशी कमाई घटली, प्राजक्ता माळीच्या सिनेमाने आत्तापर्यंत कमावले 'इतके' कोटी

'फुलवंती'ची चौथ्या दिवशी कमाई घटली, प्राजक्ता माळीच्या सिनेमाने आत्तापर्यंत कमावले 'इतके' कोटी

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या 'फुलवंती' या सिनेमामुळे चर्चेत आहे. प्राजक्ता मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा ११ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. तर प्रदर्शनाआधीच 'फुलवंती' सिनेमातील गाणीही हिट झाली. प्राजक्ता माळीच्या या सिनेमाची चाहतेही वाट पाहत होते. त्यामुळे या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाहीये. 

'फुलवंती' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. चौथ्या दिवशी या सिनेमाची कमाई घटल्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे सांगत आहेत. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रदर्शनाच्या दिवशी प्राजक्ता माळीच्या सिनेमाने केवळ ८ लाखांची कमाई केली. त्यानंतर मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाल्याचं दिसत आहे. शनिवारी प्राजक्ता माळीच्या सिनेमाने ३६ लाख रुपयांचा गल्ला जमवला. तर रविवारी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ७५ लाख रुपयांचा बिजनेस करता आला. 


पण, चौथ्या दिवशी मात्र 'फुलवंती' सिनेमाची कमाई घटल्याचं दिसत आहे. या सिनेमाला सोमवारी बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करता आलेली नाही. या सिनेमाने चौथ्या दिवशी १६ लाख रुपयांचा बिजनेस केला आहे. आत्तापर्यंत 'फुलवंती' सिनेमाने १.३५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'फुलवंती'ची जादू फिकी पडत असल्याचं दिसत आहे. 

'फुलवंती'मधून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन स्नेहल तरडेंनी केलं आहे. या सिनेमात प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, प्रसाद ओक, वैभव मांगले, स्नेहल तरडे, हृषिकेश जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सिनेमातील कलाकारही या सिनेमात झळकले आहेत. 
 

Web Title: prajakta mali phulwanti marathi movie box office collection day 4 details