गुजरातमध्ये पोहोचली प्राजक्ता माळी, 'तो' संकल्प करतेय पुर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 10:58 IST2024-12-22T10:58:35+5:302024-12-22T10:58:55+5:30
नुकतंच अभिनेत्री गुजरातमध्ये पोहचली.

गुजरातमध्ये पोहोचली प्राजक्ता माळी, 'तो' संकल्प करतेय पुर्ण
ग्लॅमरसच्या जगाशी संबंधित असलेल्या स्टार्सचा अध्यात्माशीही खोल संबंध आहे. अनेक सेलिब्रिटी जीवनातील कोणताही महत्त्वाचा निर्णय किंवा काम करण्यापूर्वी ते आपल्या गुरूचे किंवा देवाचे नाव घ्यायला विसरत नाहीत. अशीच आहे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी. गुरु, देव, अध्यात्म यावर अभिनेत्रीचा प्रचंड विश्वास आहे. सध्या प्राजक्ता १२ ज्योतिर्लिंगाच्या यात्रेवर आहे. सोशल मीडियाद्वारे तिनं ही माहिती शेअर केली.
आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या प्राजक्तानं २०२३ मध्ये १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा करण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प सध्या ती टप्प्याटप्प्याने पुर्ण करतेय. नुकतंच अभिनेत्री गुजरातमध्ये पोहचली. गुजरातमधील श्री सोमनाथ आणि श्री नागेश्वर या दोन ज्योतिर्लिंगांचे दर्शन तिनं घेतलं. याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एकाच दिवसात तिनं दोन ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद घेतले. यासोबतच तिनं द्वारकेतील कृ्ष्णमंदिरातील द्वारकाधीशाचे दर्शन घेतलं.
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर ती अलीकडेच 'फुलवंती' या मराठी सिनेमात दिसली होती. विशेष म्हणजे या सिनेमात ती अभिनेत्री असण्यासोबतच निर्मितीही होती. यात तिच्याबरोबर गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट हिट झाला असून तो प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. आता प्राजक्ता विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या आगामी पर्वातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. तसेच नुकतंच तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कार जाहीर झाला आहे.