प्राजक्ताने सांगितला केदारनाथचा अनुभव, पण 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर नाराज, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 08:56 IST2025-06-22T08:56:00+5:302025-06-22T08:56:32+5:30

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केदारनाथ दर्शनाचा अनुभव शेअर केला आहे. पण तिचे चाहते मात्र तिच्यावर नाराज झाले आहेत. काय आहे यामागचं कारण

prajakta mali going kedarnath netizens slam her because she used horse | प्राजक्ताने सांगितला केदारनाथचा अनुभव, पण 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर नाराज, काय घडलं?

प्राजक्ताने सांगितला केदारनाथचा अनुभव, पण 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर नाराज, काय घडलं?

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताला आपण विविध सिनेमा, मालिका आणि वेब शोमध्ये अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता माळीने अलीकडेच केदारनाथला जाऊन दर्शन घेतलं. यावेळी प्राजक्तासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर सुद्धा पाहायला मिळाली. प्राजक्ताने केदारनाथ दर्शनाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. पण प्राजक्ताच्या एका कृतीने लोकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली. काय घडलं?

प्राजक्ताने सांगितला केदारनाथ दर्शनाचा अनुभव

प्राजक्ता माळीने केदारनाथ दर्शनाचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता लिहिते, "३६५ दिवसांचा व्यायाम एकीकडे आणि केदारनाथ ट्रेक एकीकडे. खूपच अवघड आणि परिक्षा पाहणारा. संपुर्ण ट्रेक पायी करायला आवडला असता; परंतू आईची तब्येत बिघडली. आईला साथ आणि स्वतःची अपुरी तयारी; यामुळे सगळ्या गोष्टींचा अवलंब करत ट्रेक पुर्ण केला. तळटीप- Gym- योग हा व्यायाम वेगळा आणि ट्रेक साठी लागणारा व्यायाम वेगळा. किमान २-३ महिने आधीपासून तयारी करणे आवश्यक. अर्थात; इतर कुठल्याही गोष्टांपेक्षा मनात भाव, श्रद्धा याच गोष्टी महत्त्वाच्या."




अशाप्रकारे प्राजक्ताने तिचा अनुभव शेअर केला. प्राजक्ताने ट्रेकला जाताना पालखी आणि घोड्यांचा वापर केला. यामागचं कारण तिने जरी सांगितलं असलं तरी नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्यावर नाराजी व्यक्त केली. "प्राजक्ताने पायी जायला हवं होतं", "त्यापेक्षा हॅलीकॉप्टरने जायला हवं होतं", अशा शब्दात नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओखाली कमेंट केल्या आहेत. प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ता 'फुलवंती'नंतर कोणत्या नव्या सिनेमात दिसणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: prajakta mali going kedarnath netizens slam her because she used horse