"आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही..." प्राजक्ता माळीनं शेअर केलेली पोस्ट चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:41 IST2025-01-22T13:40:07+5:302025-01-22T13:41:28+5:30
प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

"आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही..." प्राजक्ता माळीनं शेअर केलेली पोस्ट चर्चेत!
Prajakta Mali: 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). अभिनेत्रीने या मालिकेनंतर अनेक मालिका-चित्रपटांत काम केले. तिचा चाहतावर्गाचा मोठा आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमी संपर्कात राहते. कधी इन्स्टाग्राम सेशनच्या माध्यमातून तर कधी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांची जोडलेली असते. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. तिने रस्ते अपघातांविषयी पोस्ट शेअर करत चाहत्यांना कळकळीची विनंती केली.
प्रादेशिक परिवहन विभागातर्फे दरवर्षी १-३१ जानेवारी 'रस्ता सुरक्षा अभियान' (Road Safety Campaign In Thane) राबवण्यात येतं. या अभियनाअंतर्गत प्राजक्ता माळीने ठाण्यात जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचं फ्लॅग ऑफ केलं. या अभियानाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोसोबत प्राजक्तानं वाहतुकीचे नियम पाळण्याची विनंती तिनं केली. "आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने गाडी चालवली तर सगळेच सुरक्षित राहण्यास मदत होईल", असं ती म्हणाली.
प्राजक्तानं शेअर केलेल्या एका फोटोत ती बाईकवर बसलेली दिसतेय. तिने हेल्मेट घातलेले नाही. याबद्दल तिनं तळटीप देत लिहलं, "फक्त फोटोसाठी बाईकवर बसलेय, वास्तविक मला अशा bikes चालवताच येत नाहीत. त्यामुळे मी हेल्मेट लावले नाही". तसेच प्राजक्तानं "परवाह- care - काळजी" असा सल्ला दिला.
प्राजक्तानं पोस्टमध्ये काही नियम शेअर केले...
- - दुचाकीस्वारांनी (मागे बसलेल्या माणसानेदेखील) हेल्मेट वापरणे.
- - चारचाकी वाहनांतील प्रत्येकाने #seatbelt वापरणे.
- - मद्यपान करून गाडी चालवू नये.
- - गाडी चालवतात मोबाईल न वापरणे.
- - होर्नचा कमीतकमी वापर करणे. #nohonking
- - अपघात झालाच तर समोरच्यास मदत करणे.
प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच 'फुलवंती' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात प्राजक्ता माळी अभिनेता गश्मीर महाजनीबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली. अभिनय, नृत्य अशा सगळ्याच बाबतीत अभिनेत्रीने प्रेक्षकांची मने जिंकू घेतली आहेत. तिचा हा चित्रपट जर तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर तो प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.