कुटुंब आणि गोंडस भाचींसोबत प्राजक्ता माळीने केलं सेलिब्रेशन, केकवर लिहिलंय हे खास नाव
By देवेंद्र जाधव | Updated: July 15, 2025 14:10 IST2025-07-15T14:09:37+5:302025-07-15T14:10:31+5:30
प्राजक्ता माळीने केक कापून संपूर्ण फॅमिलीसोबत सेलिब्रेशन केलं. प्राजक्ताच्या केकवर असलेल्या नावाकडे सर्वांचं लक्ष वेधलं

कुटुंब आणि गोंडस भाचींसोबत प्राजक्ता माळीने केलं सेलिब्रेशन, केकवर लिहिलंय हे खास नाव
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध सिनेमा, मालिका, वेबसीरिजमध्ये अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ताच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांचं मन जिंकलंय. प्राजक्ताच्या घरी नुकतंच एक खास सेलिब्रेशन करण्यात आलंय. यावेळी प्राजक्ताचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. काय होतं सेलिब्रेशनचं कारण? जाणून घ्या
म्हणून प्राजक्ताच्या घरी झालं खास सेलिब्रेशन
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत प्राजक्तासोबत तिच्या दोन भाची, तिची आई आणि संपूर्ण कुटुंब दिसतंय. सगळ्यांनी 'सेलिब्रेशन, सेलिब्रेशन' असं मोठ्याने ओरडत टाळ्या वाजवल्या आहेत. प्राजक्ताने मोठा केक कापून आनंद साजरा केला. प्राजक्ताच्या भाचींनी तिच्या चेहऱ्याला केक लावला. अशाप्रकारे प्राजक्ताने खास सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचं कारण म्हणजे, कर्जतला जो प्राजक्ताचा फार्महाऊस आहे त्याचं नाव 'प्राजक्तकुंज'. त्या फार्महाऊसला २ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळेच प्राजक्ताच्या घरी हे सेलिब्रेशन करण्यात आलं.
अशाप्रकारे प्राजक्ताने 'प्राजक्तकुंज'ला २ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सेलिब्रेशन केलं. प्राजक्ताच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील कलाकारांनी प्राजक्ताचं यानिमित्त अभिनंदन केलं. प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती 'फुलवंती', 'चिकी चिकी बुबुम बुम' अशा सिनेमात दिसून आली. याशिवाय ती सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करताना दिसतेय. प्राजक्ताच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.