"हे थांबवा, मी अजिबात..." स्वत:च्याच फॅन पेजवर संतापली प्राजक्ता माळी, नेमकं झालं घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:33 IST2025-12-10T10:33:24+5:302025-12-10T10:33:55+5:30
प्राजक्ता माळीनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला.

"हे थांबवा, मी अजिबात..." स्वत:च्याच फॅन पेजवर संतापली प्राजक्ता माळी, नेमकं झालं घडलं?
Prajakta Mali Angry Over Her Ai Generated Photo : मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वांची आवडती आणि लाडकी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. प्राजक्ताने आजवर अनेक चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावरही प्राजक्ताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. प्राजक्ताचे अनेक फॅन पेजही असलेले पाहायला मिळतात. या फॅन पेजवर प्राजक्ताचे अनेक फोटो आणि तिच्याबद्दलच्या गोष्टी शेअर होतात. प्राजक्ताही फॅन्सनं तिच्यासाठी तयार केलेल्या कलाकृती शेअर करत असते. पण, अशातच एका फॅन पेजवर आपला AI फोटो पाहून प्राजक्ता संतापलेली पाहायला मिळाली.
नुकतंच प्राजक्ताच्या एका फॅन पेजनं तिचा एआयद्वारे फोटो क्रिएट केला. हा प्राजक्ताला मुळीच आवडला नाही. तिने तो फोटो स्टोरीवर शेअर करत राग व्यक्त केला. तिनं लिहलं, "हा फोटो दिसायला कितीही सुंदर असला तरी मी या फोटोचे कौतुक अजिबात करणार नाही. मी AI ने तयार केलेल्या फोटो आणि व्हिडिओंना अजिबात प्रोत्साहन देणार नाही. मी माझ्या फॅन पेजेसना तसेच इतरांनाही विनंती करते की हे असे फोटो आणि व्हिडीओ बनवणं थांबवा", या शब्दात प्राजक्तानं चाहत्यांना कळकळीची विनंती केली.

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिची भूमिका असलेला 'फुलवंती' सिनेमा प्रचंड गाजला. 'फुलवंती' हा सिनेमा ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेला. या सिनेमात प्राजक्ताने प्रमुख भूमिका साकारली याशिवाय तिने सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमातील गाणीही लोकप्रिय ठरली. फुलवंतीमधील 'मदनमंजिरी' हे लावणी गाणं हिट झालं होतं. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करत आहे. तिच्या नवीन सिनेमाची तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे.