'पछाडलेला' सिनेमातील श्रेयसची गर्लफ्रेंड आठवते? आता झालाय 'इतका' बदल, काय करते माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 16:13 IST2024-07-23T16:01:39+5:302024-07-23T16:13:08+5:30
'पछाडलेला' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. याच सिनेमात श्रेयसची गर्लफ्रेंड मनिषा हे पात्र साकारून अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी प्रसिद्धीझोतात आली होती.

'पछाडलेला' सिनेमातील श्रेयसची गर्लफ्रेंड आठवते? आता झालाय 'इतका' बदल, काय करते माहितीये का?
'पछाडलेला' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. श्रेयस तळपदे, भरत जाधव, लक्ष्मीकांत बेर्डे, वंदना गुप्ते अशी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. बाबा लगीन, डोळे बघ डोळे बघ हे सिनेमातील डायलॉगही प्रचंड हिट ठरले होते. २००४ साली हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. याच सिनेमात श्रेयसची गर्लफ्रेंड मनिषा हे पात्र साकारून अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी प्रसिद्धीझोतात आली होती.
या सिनेमात छोट्याशा भूमिकेत असूनही तिने छाप पाडली होती. आता इतक्या वर्षांनंतर माक्र अश्विनीमध्ये खूप बदल झाला आहे. पहिल्यापेक्षा आता अश्विनी जास्त ग्लॅमरस दिसते. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नव्या प्रोजेक्टबरोबरच अनेकदा अश्विनी तिचे ग्लॅमरस फोटोही शेअर करताना दिसते.
अश्विनीने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. 'सख्या रे' या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 'गोविंदा', 'विठ्ठल माझा सोबती', 'घे डबल', 'व्हॉट्स अप लग्न', 'फुलराणी', 'बापू वीरू वाटेगावकर', '८ दोन ७५' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. 'नाय वरण भात लोणचं, कोण नाय कोणचं' या सिनेमातील तिची भूमिका विशेष गाजली. आता अश्विनी 'गुगल आई' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.