हे आपलं काळीज हाय...! ‘वन फोर थ्री’चा अंगावर काटा आणणारा Teaser, सोशल मीडियावर धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 18:46 IST2022-01-28T18:42:20+5:302022-01-28T18:46:11+5:30
One Four Three Marathi Movie Teaser : टीझर इतका भन्नाट आहे की, तुम्हीही पाहताक्षणीच प्रेमात पडाल. साऊथसारखा थ्रील, अॅक्शन, लव्ह, रोमान्स, इमोशन्स असं सगळं काही या टीझरमध्ये आहे.

हे आपलं काळीज हाय...! ‘वन फोर थ्री’चा अंगावर काटा आणणारा Teaser, सोशल मीडियावर धुमाकूळ
143 Movie : हे आपलं काळीज हाय..., या टॅगलाईनची आधीच चर्चा आहे, आता ही टॅगलाईन असलेल्या मराठी सिनेमाच्या टीझरचीही जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचं नाव आहे, ‘वन फोर थ्री’ (One Four Three).
सिनेमाचा टीझर रिलीज झालाये आणि या टीझरने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे. मधु आणि विशुची प्रेमकहाणी रेखाटणारा टीझर इतका भन्नाट आहे की, तुम्हीही पाहताक्षणीच प्रेमात पडाल. साऊथसारखा थ्रील, अॅक्शन, लव्ह, रोमान्स, इमोशन्स असं सगळं काही या टीझरमध्ये आहे.
या टीझरमध्ये विशू आणि मधु यांच्या लव्हस्टोरीची झलक पाहायला मिळते. टीझर पाहिल्यानंतर साऊथच्या सिनेमाचीही आठवण होते. होय, साऊथच्या सिनेमाच्या धाटणी वाटावा असा ‘वन फोर थ्री’चा 1 मिनिट 5 सेकंदाचा टीझर शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
प्रेमात बुडालेला नायक आणि नायिका, आपलं काळीज आहेस तू..., हा नायिकेचा तोंडचा डायलॉग सगळंच मनाला स्पर्शून जातं.
या सिनेमात योगेश भोसले आणि शीतल अहीरराव ही जोडी मुख्य भूमिकेत आहे. योगेश भोसले हाच या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. वृषभ शहा या चित्रपटात विलनच्या भूमिकेत आहे. साहजिकच चित्रपटाच्या टिझरने मात्र चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. शारदा फिल्म्स प्रॉडक्शन आणि विरकुमार शहा निर्मित असून, 4 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.