एकेकाळी वर्षा उसगांवकर यांच्या टॉपलेस फोटोशूटनं माजवली होती खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 17:40 IST2022-02-28T17:40:18+5:302022-02-28T17:40:42+5:30
वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar)आजही तितक्याच सुंदर दिसतात.

एकेकाळी वर्षा उसगांवकर यांच्या टॉपलेस फोटोशूटनं माजवली होती खळबळ
अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या गंमत जंमत या पहिल्याच चित्रपटातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली होती. वर्षा उसगांवकर यांनी मराठी, हिंदी, बंगाली, भोजपुरी, कोंकणी, राजस्थानी अशा वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. वर्षा यांच्या सिनेकारकीर्दीत एका इंग्रजी मासिकासाठी केलेल्या टॉपलेस फोटोशूटची खूप चर्चा झाली होती. या फोटोशूटमुळे सिनेइंडस्ट्रीत खळबळ उडाली होती.
वर्षा उसगांवकर यांनी ‘हमाल दे धमाल’, ‘गंमत जंमत’, ‘लपंडाव’, ‘भुताचा भाऊ’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला होता. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी हिंदी सिनेइंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. ‘तिरंगा’, ‘दूध का कर्ज’, ‘घर आया मेरा परदेसी’ अशा हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच त्यांनी एका इंग्रजी मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. मात्र या फोटोशूटमुळे खूप खळबळ माजली होती. त्यावेळी त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.
१० वर्षांनी छोट्या पडद्यावर केलं कमबॅक
वर्षा उसगांवकर सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत त्या नंदिनीची भूमिका साकारत आहेत. जवळपास १० वर्षांनंतर त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे.