'आयुष्यात कितीही घरं-दारं झाली, तरी...', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 12:37 IST2023-07-21T12:36:40+5:302023-07-21T12:37:28+5:30

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.

'No matter how many houses and doors are built in life...', Prajakta Mali's post is in discussion | 'आयुष्यात कितीही घरं-दारं झाली, तरी...', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

'आयुष्यात कितीही घरं-दारं झाली, तरी...', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच प्राजक्ताने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, आयुष्यात कितीही घरं-दारं झाली; तरी आर्ट ॲाफ लिव्हींग चं आश्रम माझं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं, आहे आणि असेल. Passionately dispassionate.. (कधीही आश्रमवासी होऊ शकते...) #गुरूतत्व #सानिध्य #ध्यान #योगी #शांती. या पोस्टमध्ये प्राजक्ताने तिचा फोन बंद असणार असल्याचेही सांगितले आहे.

वर्कफ्रंटबद्दल...
मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात काही मालिकेत काम करून प्राजक्ता घराघरात पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचेही स्वप्न तिने पाहिले आणि ते स्वप्न सत्यात उतरवले. मालिका, चित्रपट, वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमधील तिच्या लूकची बऱ्याचदा चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं तर प्राजक्ता शेवटची लकडाउन चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अकुंश चौधरी मुख्य भूमिकेत झळकली आहे. 

Web Title: 'No matter how many houses and doors are built in life...', Prajakta Mali's post is in discussion