"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:54 IST2025-11-15T10:53:09+5:302025-11-15T10:54:16+5:30
निवेदिता सराफ यांनी ठाण्याला झालेल्या एका कार्यक्रमात भाजपला पाठिंबा दिला असून बिहार निवडणुकीत पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केलाय. काय म्हणाल्या?

"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी. हे दोघेही ठाण्यातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत निवेदिता यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात निवेदिता यांनी भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा देत बिहार निवडणुकीत भाजपचा जो विजय झाला, त्याबद्दल अभिनंदन केलं. काय म्हणाल्या निवेदिता? जाणून घ्या.
मी कट्टर बीजेपी समर्थक
निवेदिता सराफ त्यांचं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या- ''मंचावर उपस्थित असलेले आमदार संजय केळकर तुमचंं बिहारबद्दल खूप खूप अभिनंदन . मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्याने मला फारच आनंद झाला आहे.'' अशाप्रकारे निवेदिता सराफ यांनी बिहार निवडणुकीत भाजपला जे यश मिळालं त्याबद्दल आनंद व्यक्त केला.
निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या, ''आजचा हा क्षण माझ्यासाठी खूपच इमोशनल होता. मी तुमची खूप आभारी आहे. नुसता पुरस्कार मिळाला असं नाही, पण ज्यांच्याकडून मला हा पुरस्कार मिळाला ते माझे गुरु, माझे पती. आज मी जी काही आहे ते फक्त त्यांच्यामुळे आहे. आणि त्यांच्याहस्ते हा पुरस्कार तुम्ही मला हा पुरस्कार दिलात. हे जे काही तुम्हाला सुचलं ना, त्यासाठी तुमचे प्रथम खूप खूप आभार''
अशाप्रकारे निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत आहे. निवेदिता सराफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, त्यांची भूमिका असलेली 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका चांगलीच गाजली. काहीच महिन्यांपूर्वी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशातच निवेदिता पती अशोक सराफ यांच्यासह 'अशोक मा.मा.' मालिकेत झळकल्या. पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर या दोघांनी यानिमित्त एकत्र काम केलं.