ब्यूटी विथ ब्रेन! गोल्ड मेडलिस्ट आहे निशिगंधा वाड-दीपक देऊलकरांची लेक; सिनेसृष्टीत एन्ट्री घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:17 IST2025-11-04T12:10:24+5:302025-11-04T12:17:31+5:30
निशिगंधा वाड यांची लेक करणार फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण? वडील दीपक देऊलकर म्हणाले "देवाच्या कृपेने ती...."

ब्यूटी विथ ब्रेन! गोल्ड मेडलिस्ट आहे निशिगंधा वाड-दीपक देऊलकरांची लेक; सिनेसृष्टीत एन्ट्री घेणार?
Deepak Dewoolkar About Daughter Industry Debut: अभिनेत्री निशिगंधा वाड आणि दीपर देऊलकर ही मराठी सिने-इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे.या दोघांनी आतापर्यंत अनेक मराठी-हिंदी मालिका,चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या दीपक देऊळकर सिनेइंडस्ट्रीत फारसे सक्रीय नाहीत. पण, पडद्यामागे त्यांचा वावर आहे. त्यात आता जोडप्याची लेक चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.
निशिगंधा आणि दीपक यांची लेक सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. मात्र, तिची चाहत्यांमध्ये अनेकदा चर्चा होताना दिसते. ईश्वरी अगदी हुबेहुबे आईची कॉपी आहे. त्यामुळे अनेकदा ती फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार का असा प्रश्न निशिगंधा आणि दीपक यांना कायम विचारला जातो. अशातच नुकत्याच 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत या चर्चांवर भाष्य केलं आहे. त्यावर बोलताना दीपक देऊलकर म्हणाले,"
गेल्या वर्षीच ती युनिव्हर्सिटीत पहिली आली. पॉलिटीकल सायन्स आणि फॉरेन अफेअर्स मध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं. चौथीत असल्यापासूनच तिने डान्य आणि अभिनयात उत्तम होती. तिने अनुपम खेर अकॅडमी सुद्धा जॉईन केली आहे. तसंच तिला डान्समध्ये गोल्डमेडल देखील मिळालं आहे. पण,योगायोगाने युनिव्हर्सिटीतूनच तिला सांगण्यात आलं की, तू युपीएससी कर."
त्यानंतर दीपक देऊलकर म्हणाले, "मी किंवा निशिगंधाने पण असं केलं की नाही तू हेच कर किंवा ते कर.आम्हाला माहिती होतं तिचा कल या क्षेत्राकडे आहे. आम्ही तिला स्पष्ट सांगितलंय की तुला जे हवंय ते तू कर. कारण, आम्हाला आमच्या आई-वडिलांनी कधी अडवलं नाही.मी तर टाटा स्टिलमधील नोकरी सोडून इकडे आलो आहे. तिच्या बाबतीत देखील आम्ही तेचं ठेवलं. आणि मला वाटतं काहीही बोलण्याच्या आधी ती देवाच्या कृपेने लवकरच...", असं म्हणत दीपक यांनी लेकीच्या मनोरंजन क्षेत्रातील पदार्पणाबद्दल हिंट दिली आहे.