Nagraj Manjule : भारीच की! 'घर बंदूक बिरयानी' नंतर नागराज अण्णा आणखी एका सिनेमात झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 17:07 IST2023-04-06T17:05:42+5:302023-04-06T17:07:23+5:30
Nagraj Manjule :'घर बंदूक बिरयानी'या सिनेमात नागराज अण्णा एका तडफदार पोलिस ऑफीसरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार हवा आहे. अशात आता अण्णांच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुडन्यूज आहे....

Nagraj Manjule : भारीच की! 'घर बंदूक बिरयानी' नंतर नागराज अण्णा आणखी एका सिनेमात झळकणार
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंचा 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा उद्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. आकाश ठोसर, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, सायली पाटील यांच्यासोबत नागराज या सिनेमात धमाकेदार ॲक्शन करताना दिसणार आहेत. या सिनेमात नागराज अण्णा एका तडफदार पोलिस ऑफीसरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. नागराज अण्णांना पाहायला चाहते भलतेच उत्सुक आहेत. सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार हवा आहे. अशात आता अण्णांच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुडन्यूज आहे. होय, 'घर बंदूक बिरयानी' नंतर नागराज मंजुळे आणखी एका मराठी सिनेमात अभिनय करणार आहेत. खुद्द त्यांनीच याचा खुलासा केला.
लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत नागराज यावर बोलले. 'झुंड', 'घर बंदूक बिरयानी' यानंतर मी आणखी एका मराठी सिनेमात झळकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या चित्रपटाच्या नावाचा खुलासाही त्यांनी केला.
ते म्हणाले, फ्रेम नावाचा सिनेमा येतोय. त्यात मी पुन्हा अभिनय करणार आहे. या चित्रपटात मी अमेय वाघसोबत दिसणार आहे. आजवर मी अनेक सिनेमांत छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु अभिनेत्यापेक्षा दिग्दर्शक किंवा निर्माता होणं जरा जास्त चांगलं वाटतं, असंही ते म्हणाले. या चित्रपटाबद्दल तपशीलात बोलणं त्यांनी टाळलं. परंतु अण्णा फ्रेम या सिनेमात झळकणार म्हटल्यावर चाहते क्रेझी झाले आहेत. अमेय वाघ व नागराज अण्णांची जोडी येत्या काळात बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमाबद्दल सांगायचं झाल्यास, हा सिनेमा हेमंत जंगल अवताडे यांनी दिग्दर्शित केला आहे.