जब्याच्या शालूने घेतला लग्न न करण्याचा निर्णय?; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 16:29 IST2023-11-02T16:28:49+5:302023-11-02T16:29:27+5:30
Rajeshwari Kharat: राजेश्वरीने शेअर केलेल्या व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

जब्याच्या शालूने घेतला लग्न न करण्याचा निर्णय?; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
नागराज मंजुळे (nagraj manjule) यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. 'फॅण्ड्री' या सिनेमात शालू ही भूमिका साकारुन राजेश्वरीने विशेष लोकप्रियता मिळवली. परंतु, या सिनेमानंतर राजेश्वरी फारशी कुठे दिसली नाही. परंतु, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. अनेकदा राजेश्वरी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असते. परंतु, यावेळी ती एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये तिने चक्क लग्न न करायचं म्हटलं आहे.
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून कायम ती नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन आणि तिने ज्या संवादावर हा व्हिडीओ केलाय तो डायलॉग दोन्ही चर्चेत येत आहेत.
'लग्नानंतर या मुलीचं काय होणार आहे काय माहित?', असं जेव्हा आई म्हणते त्यावेळी माझं उत्तर काय असतं हे राजेश्वरीने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे. "मैं शादी में बिलिव्ह ही नहीं करती. मेरे लाइफ में एैसी कोई कमी नहीं हैं, जो कोई हसबंड आए और उसे पुरा करे. मैं ए नहीं कहती की सभी लडकियाँ गलत हो पर मेरे लिए यही सही हैं. शादी...नो वे..", असा डायलॉग या व्हिडीओमध्ये राजेश्वरी म्हणताना दिसते.
दरम्यान, राजेश्वरीने खरोखरच लग्न न करण्याचा निर्णय घेतला नसून हा केवळ एक मजेचा भाग आहे. परंतु, तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट केल्या आहेत. राजेश्वरी सोशम मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या चर्चेत येत असते.