सैन्यात असलेल्या वडिलांचं निधन अन्..; 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाचा डोळ्यात पाणी आणणारा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:25 IST2025-01-18T10:23:11+5:302025-01-18T10:25:26+5:30

मायरा वायकुळच्या निरागस अभिनयाने सजलेल्या 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (mukkam post devach ghar)

Mukkam Post Devach ghar trailer starring myra vaikul mangesh desai usha nadkarni | सैन्यात असलेल्या वडिलांचं निधन अन्..; 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाचा डोळ्यात पाणी आणणारा ट्रेलर

सैन्यात असलेल्या वडिलांचं निधन अन्..; 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाचा डोळ्यात पाणी आणणारा ट्रेलर

गेल्या काही दिवसांपासून मुक्काम पोस्ट देवाचं घर सिनेमाच्या ट्रेलरची सर्वांना उत्सुकता आहे. अखेर नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून उलगडणार आहे. हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारा 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाचा ट्रेलर खूप खास आहे. 

सिनेमाची कथा काय?

लहान मुलांच्या भावविश्वात खूप काही सुरू असतं. मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मुलं आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करतात. "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो.

त्याबरोबरच तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या कथानकाची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या, रंजक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरमधून समजतं आहे. श्रवणीय संगीताचीही जोड या कथानकाला असून "सुंदर परिवानी" ह्या गोड़ गीताला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. 

कधी होतोय रिलीज?

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन केले आहे. या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार  यांच्या मध्यवर्ती भूमिका  चित्रपटात पहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. तर असा हा सहकुटुंब पाहता येणारा चित्रपट येत्या ३१ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.
 

Web Title: Mukkam Post Devach ghar trailer starring myra vaikul mangesh desai usha nadkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.