Mrunmayee Deshpande : आता मला नवीन कामं शोधली पाहिजेत..., मृण्मयी देशपांडे असं का म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 17:34 IST2022-08-18T17:32:07+5:302022-08-18T17:34:04+5:30
Mrunmayee Deshpande : लई खुट्टा पडलाय आणि यासाठी तिला आता नवीन कामं शोधली पाहिजेत...., हे आम्ही नाही तर खुद्द मृण्मयी देशपांडेनं म्हटलं आहे. का? तर गिफ्ट.

Mrunmayee Deshpande : आता मला नवीन कामं शोधली पाहिजेत..., मृण्मयी देशपांडे असं का म्हणाली?
मृण्मयी देशपांडेचा (Mrunmayee Deshpande) खिसा एकदम रिकामा झालाये..., होय, लई खुट्टा पडलाय आणि यासाठी तिला आता नवीन कामं शोधली पाहिजेत...., आता हे आम्ही नाही तर खुद्द मृण्मयी देशपांडेनं म्हटलं आहे. का? तर गिफ्ट. होय, मृण्मयीनं बहिण गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande) हिला लाखोचं गिफ्ट दिलं. मग काय, खिसा रिकामा झाला ना राव... अर्थात हा गमतीत भाग.
मृण्मयी व गौतमी या दोघी बहिणींचं एकमेकींवर किती प्रेम आहे, हे वेगळं सांगायला नको. मृण्मयी मोठी बहिण, साहजिकच धाकट्या गौतमीचे लाड पुरवणार. अलीकडे मृण्मयीने गौतमीला एक खास गोष्ट गिफ्ट केली. होय, तिने गौतमीला आयफोन गिफ्ट दिला. या आयफोनची किंमत एक लाखाच्यावर आहे.
लाखोचा आयफोन प्रो गिफ्ट मिळाल्यावर गौतमीने लगेच इन्स्टा स्टोरी शेअर केली. यात तिने आयफोन प्रोचा फोटो शेअर केला. शिवाय या महागड्या गिफ्टसाठी मृण्मयीला थँक्यू देखील म्हटलं.
गौतमीची ही स्टोरी मृण्मयीनं देखील शेअर केली. पण खुट्टा पडला ना राव...! हो, ही स्टोरी शेअर करताना मृण्मयीनं मजेशीर कॅप्शन दिलं. ‘यासाठी आता मला नवीन कामं शोधली पाहिजेत, लई खुट्टा पडलाय ...’ असं तिनं लिहिलं.
मृण्मयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करते. ती आणि तिची बहिण गौतमी देशपांडे कायम मजेशीर रील शेअर करतात. दोघींचं बॉन्डिंग आणि विनोदी शैली चाहत्यांना भुरळ घालत असते.