'याच्यासाठी मी कुणाचा जीवही घेऊ शकते...', असं का म्हणतेय अभिनेत्री मिताली मयेकर; जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 13:48 IST2024-01-10T13:44:02+5:302024-01-10T13:48:53+5:30
मिताली मयेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.

'याच्यासाठी मी कुणाचा जीवही घेऊ शकते...', असं का म्हणतेय अभिनेत्री मिताली मयेकर; जाणून घ्या याबद्दल
मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये साकारलेल्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे मितालीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मिताली मयेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं.
मिताली मयेकर ही मावशी झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर छोट्या बाळासोबतचे फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. तिने लिहलं, 'या बाळानं कदाचित मला अजून ओळखलंही नसेल...आणि तरीही मी कोणताही विचार न करता याच्यासाठी अगदी कुणाचाही जीव घेऊ शकते. कदाचित 'मावशी' होणं असचं असतं'.
मितालीने एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमध्ये काम केले आहे. तर ‘उर्फी’ या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिला जितकी अभिनयाची आवड आहे. तितकीच तिला फिरण्याचीही आवड आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन ठिकाणं, नवीन देशांमध्ये भटकंती करत असते. मिताली आणि तिचा पती अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ही मराठी सिनेसृष्टीतील बेधडक जोडी. या लोकप्रिय जोडीचे प्रचंड चाहते आहेत. आपलं आयुष्य आपल्या नियमांवर जगणारे मिताली आणि सिद्धार्थ कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.