मितालीच्या बार्बी लुकवर नवरा सिद्धार्थची भन्नाट कमेंट, म्हणाला, 'लगीन करायचंय...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 17:35 IST2023-07-23T17:35:13+5:302023-07-23T17:35:57+5:30

मिताली मयेकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

mitali mayekar barbie look video husband siddharth chandekar comments with hillarious caption | मितालीच्या बार्बी लुकवर नवरा सिद्धार्थची भन्नाट कमेंट, म्हणाला, 'लगीन करायचंय...'

मितालीच्या बार्बी लुकवर नवरा सिद्धार्थची भन्नाट कमेंट, म्हणाला, 'लगीन करायचंय...'

सध्या सोशल मीडियावर बार्बी चा ट्रेंड सुरु आहे. अनेक जण बार्बी लुकमध्ये आपले फोटो शेअर करत आहेत. मराठमोळ्या अभिनेत्रींनाही बार्बीची भुरळ पडली आहे. नुकतंच अभिनेत्री मिताली मयेकरने (Mitali Mayekar) वेगवेगळ्या साडीतील फोटो, व्हिडिओ शेअर करत त्याला बार्बी लुक दिला. यावर नवरा सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) दिलेली कमेंट चर्चेत आहे. 

मिताली मयेकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या साडीत पोज देताना दिसत आहे. 'बार्बी जर भारतीय असती तर?' असं भन्नाट कॅप्शनही तिने दिलं आहे. मितालीचा हा लुक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. तिच्या या लुकवर नवरा सिद्धार्थ चांदेकरही फिदा झालाय.

मितालीच्या या व्हिडिओवर सिद्धार्थ म्हणतो, 'बार्बीसोबत लगीन करायचंय करु दे ना वं' अशी क्युट कमेंट त्याने पोस्ट केली आहे. तर यावर रिप्लाय देत मिताली'ओते' असं म्हणाली. आहे. मितालीचा हा बार्बी लुक मराठीतील इतर कलाकारांच्याही पसंतीस पडलाय. गायत्री दातार, रसिका सुनील यांनी देखील तिच्या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली नेहमीच चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. नुकतेच ते युरोप ट्रिपवरुन परत आले असून तेथील त्यांचे फोटो चाहत्यांच्या भलतेच पसंतीस पडले. सध्या ही गोड जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. 

Web Title: mitali mayekar barbie look video husband siddharth chandekar comments with hillarious caption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.