हृदयाला हादरवणारी एक अकल्पनीय प्रेमकथा; 'माझी प्रारतना' या मराठी सिनेमाची घोषमा; कधी होणार रिलीज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:35 IST2025-03-06T12:34:22+5:302025-03-06T12:35:05+5:30

'माझी प्रारतना' या आगळ्यावेगळ्या मराठी सिनेमाची घोषणा झाली असून जाणून घ्या या सिनेमाविषयी

mazi prartana marathi movie announcement starring upendra limaye | हृदयाला हादरवणारी एक अकल्पनीय प्रेमकथा; 'माझी प्रारतना' या मराठी सिनेमाची घोषमा; कधी होणार रिलीज?

हृदयाला हादरवणारी एक अकल्पनीय प्रेमकथा; 'माझी प्रारतना' या मराठी सिनेमाची घोषमा; कधी होणार रिलीज?

मराठी मनोरंजन विश्वातील एका नव्या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ही एक आगळीवेगळी लव्हस्टोरी असणार आहे. दोन हृदयांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम, आणि लवकरच एक अशक्यप्राय प्रेमकथा चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. "माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा", लेखक व दिग्दर्शक पद्माराज राजगोपाल नायर यांचा हा नवा मराठी चित्रपट, प्रेमाच्या कच्च्या आणि तीव्र भावनांना समोर आणणारा आहे, जो तुमच्या हृदयाला हादरवून टाकेल.

माझी प्रारतना सिनेमाची घोषणा

ब्रिटिश काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घडणारी ही संगीतप्रधान कथा आहे, जी प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. ही प्रेमकथा इतकी ताकदीची आणि हृदयस्पर्शी आहे की, वादळासारखी तुमच्यावर आदळेल—तुम्हाला स्तब्ध आणि भारावून टाकेल. जीवनात कितीही दुःख असली तरी प्रेम अंतिम सत्य असते, आणि हा मन हेलावून टाकणारा प्रवास तुम्हाला दाखवेल की प्रेम हीच सर्वकाही जिंकण्याची खरी ताकद आहे.


कधी रिलीज होणार माझी प्रारतना

"माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा" ९ मे २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप मुख्य भूमिका साकारत आहेत, तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकार देखील यात झळकणार आहेत. एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत, पद्माराज नायर फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केले आहे, तर संगीत विश्वजित सी टी यांनी दिले आहे. चित्रपटाबद्दल अधिक माहिती सध्या गुलदस्त्यात असली तरी लवकरच टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे.

Web Title: mazi prartana marathi movie announcement starring upendra limaye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.