कुर्यात सदा मंगलम्! लोकप्रिय गायिका शुभांगी केदारने बांधली लग्नगाठ, कोण आहे तिचा नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:31 IST2026-02-11T17:30:44+5:302026-02-11T17:31:10+5:30
लोकप्रिय मराठी गायिकाही लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सिंगर शुभांगी केदार हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे.

कुर्यात सदा मंगलम्! लोकप्रिय गायिका शुभांगी केदारने बांधली लग्नगाठ, कोण आहे तिचा नवरा?
मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तर काही लग्न करण्याच्या तयारीत आहेत. नुकतंच साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांच्यापाठोपाठ लोकप्रिय मराठी गायिकाही लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सिंगर शुभांगी केदार हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे.
शुभांगीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. लग्नासाठी शुभांगीने खास लूक केला होता. नऊवारी साडीत पारंपरिक अंदाजात ती नटली होती. तर तिच्या नवऱ्याने धोतर घातलं होतं. पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. रिसेप्शनसाठी दोघांनी खास लूक केल्याचं पाहायला मिळालं. हिरव्या रंगाच्या साडीमध्ये शुभांगीचं सौंदर्य खुललं होतं. एका व्हिडीओमध्ये तिची लग्नातील लूकची झलक दिसत आहे.
शुभांगीच्या नवऱ्याचं नाव प्रणित वानवे असं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. प्रणितदेखील एक कलाकार आहे. शुभांगीच्या अनेक अल्बम साँगमध्येही त्याने मदत केली आहे. शुभांगी एक लोकप्रिय गायिका आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. तिचं ऐरणीच्या देवा तुला हे गाणंही लोकप्रिय झालं.