शाळेत असताना प्रेमात पडला होता अवधूत गुप्ते; सांगितला प्रपोजचा भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 15:50 IST2023-10-01T15:50:00+5:302023-10-01T15:50:00+5:30
Avadhoot Gupte: 'हे' होतं अवधूत गुप्तेचं पहिलं प्रेम; शाळेत असताना केलं होतं प्रपोज

शाळेत असताना प्रेमात पडला होता अवधूत गुप्ते; सांगितला प्रपोजचा भन्नाट किस्सा
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक म्हणजे अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte). आपल्या दमदार गाण्यांमुळे चर्चेत येणारा अवधूत त्याच्या हटके आणि बिनधास्त स्वभावामुळेही चर्चेत येत असतो. अलिकडेच अवधूतने लोकमत फिल्मीसोबत एक छानसा खेळ खेळला. या खेळामध्ये त्याने त्याच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केलं. विशेष म्हणजे यावेळी बोलत असताना त्याने त्याच्या पहिल्या क्रशविषयी भाष्य केलं. इतकंच नाही तर त्याने पहिल्यांदा प्रपोज कधी केलं हे सुद्धा सांगितलं.
अलिकडेच अवधूतने लोकमतच्या My 1st या सेगमेंटमध्ये काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्याला 'पहिल्यांदा कोणाला प्रपोज केलं आणि कधी केलं?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'मी शाळेत असताना पहिलं प्रपोज केलं होतं', असा खुलासा त्याने केला.
"मी शाळेत असताना पहिलं प्रपोज केलं होतं. होती एक...इयत्ता ४ तुकडी अ मध्ये असताना मी केलं होतं प्रपोज", असं म्हणत अवधूतने त्याच्या प्रपोजचा किस्सा सांगितला. सोबतच त्याची सेलिब्रिटी क्रश कोण हेदेखील त्याने सांगितलं.
दरम्यान, अवधूत बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिचा मोठा चाहता आहे. फारपूर्वी पासून ते आतापर्यंत त्याला काजोल अभिनेत्री म्हणून आवडते असंही त्याने सांगितलं. काही दिवसांपूर्वीच अवधुतचा खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमात राजकीय व्यक्तींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.