मराठीतील 'हे' दोन प्रसिद्ध गायक आहेत बाईक रायडर; बाईकवरुन केलाय दूरदूरपर्यंतचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 18:53 IST2023-09-05T18:53:06+5:302023-09-05T18:53:30+5:30
Marathi singer: त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये रॉयल एन्फिल्डसारखा गाड्यांचा समावेश आहे.

मराठीतील 'हे' दोन प्रसिद्ध गायक आहेत बाईक रायडर; बाईकवरुन केलाय दूरदूरपर्यंतचा प्रवास
मराठी कलाविश्वातील दोन प्रसिद्ध गायक, संगीतकार म्हणजे अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर. या दोघांनीही मराठी कलाविश्वात त्यांचं हक्काचं भक्कम असं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या आवाजाच्या जोरावर ही जोडी श्रोत्यांच्या मनावर गारुड घालून आहे. विशेष म्हणजे गायनाची आवड जपत करिअर करणाऱ्या या दोघांनी त्यांचं आणखी एक पॅशन उत्तमरित्या सांभाळलं आहे.
स्वप्नील आणि अवधूत हे दोघं उत्तम गायक असण्यासोबतच बाईक रायडर्स सुद्धा आहेत. या दोघांनी बाईकवरुन अनेक नवनवीन ठिकाणांना भेट दिली आहे. इतकंच नाही तर या दोघांना बुलेटचं प्रचंड वेड आहे. त्यामुळे त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये रॉयल एन्फिल्डसारखा गाड्यांचा समावेश आहे.
दरम्यान, स्वप्नील आणि अवधूत यांनी त्यांच्या रायडिंगचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे दोघं एकमेकांचे खूप जुने मित्र आहे.