प्रतीक्षा संपली ! 'टाइमपास ३' मधील धम्माल ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:45 IST2022-07-22T15:36:31+5:302022-07-29T17:45:52+5:30

टाइमपासच्या यापूर्वीच्या दोन्ही भागातील गाणी विशेष लोकप्रिय झाली होती. टाइमपास ३ मधील ‘वाघाची डरकाळी’गाण्याची वाट प्रेक्षक आतुरतेने बघत होते.

Marathi movie 'Timepass 3' movie 'Waghachi Derakali' song release | प्रतीक्षा संपली ! 'टाइमपास ३' मधील धम्माल ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

प्रतीक्षा संपली ! 'टाइमपास ३' मधील धम्माल ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

टाइमपास ३ च्या टिझर आणि ट्रेलरमधून एका गाण्याच्या केवळ एकाच ओळीने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली होती. ती ओळ होती ‘याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डरकाळी’ ! ही एवढी एकच ओळ ऐकून हे गाणं धमाल असणार आहे हे रसिकांनी ओळखलं होतं. त्यामुळेच ते या गाण्याची उत्सुकतेने वाट बघत होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे कारण हे पूर्ण गाणं त्यांच्या भेटीला आलं आहे. वैशाली सामंतच्या ठसकेबाज आवाजाचा तडका लागलेलं आणि कृतिका गायकवाडच्या दिलखेचक अदांनी सजलेलं हे गाणं धमाका उडवून देण्यास सज्ज झालं आहे.  
 

टाइमपासच्या यापूर्वीच्या दोन्ही भागातील गाणी विशेष लोकप्रिय झाली होती. रोमॅंटिक गाण्यांबरोबरच पहिल्या भागातील ‘ही पोली साजूक तुपातली’ आणि दुसऱ्या भागातील ‘ऍम्ब्युलन्स सॉंग’ने सर्वत्र एकच धम्माल उडवून दिली होती. तशीच धम्माल उडवून द्यायला आणि दंगा घालायला टाइमपास ३ मधील ‘वाघाची डरकाळी’ आलं आहे. क्षितीज पटवर्धनचे शब्द असलेल्या या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे अमितराजने तर आवाज आहे वैशाली सामंतचा. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणेच याही गाण्याचं जोशपूर्ण ढंगातलं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी तर या गाण्यावर ठेका धरत दिलखेचक अदा पेश केल्या आहेत कृतिका गायकवाडने.

टिझर असो ट्रेलर असो की गाणी टाइमपास ३ दिवसेंदिवस प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतच आहे. येत्या २९ जुलैला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांचं आहे तर प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे ही जोडी मुख्य भूमिकेत आहे.
 

Web Title: Marathi movie 'Timepass 3' movie 'Waghachi Derakali' song release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.