Video: नेमका कसा तयार झाला 'झिम्मा 2'; पाहा सिनेमाचा मेकिंग व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 14:07 IST2023-12-12T14:06:12+5:302023-12-12T14:07:10+5:30

Jhimma2: पडद्यामागे या सगळ्या अभिनेत्रींचं छान ट्युनिंग जमल्यामुळेच पडद्यावरही त्यांची मैत्री सुंदररित्या दिसून आली.

marathi movie jhimma 2 making video share by rinku rajguru | Video: नेमका कसा तयार झाला 'झिम्मा 2'; पाहा सिनेमाचा मेकिंग व्हिडीओ

Video: नेमका कसा तयार झाला 'झिम्मा 2'; पाहा सिनेमाचा मेकिंग व्हिडीओ


सध्या बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा 2' हा सिनेमा चांगलाच हिट ठरतोय.  त्यामुळे या सिनेमाविषयी आणि त्यातील अभिनेत्रींविषयी अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा हा सिनेमा नेमका कसा तयार झाला असेल. सिनेमाच्या सेटवर नेमकं कशाप्रकारे सीन शूट झाले असतील हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं दिसून येतं. यामध्येच अभिनेत्री रिंकू राजगुरु (rinku rajguru) हिने सिनेमाचा मेकिंग व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिने शेअर केलेला हा BTS व्हिडीओ अल्पावधीत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे आतापर्यंत तिने 'झिम्मा 2' या सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. यामध्येच तिने आता सिनेमाचा मेकिंग व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण कशा प्रकारे पार पडलं हे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पडद्यामागे या सगळ्या अभिनेत्रींचं छान ट्युनिंग जमल्यामुळेच पडद्यावरही त्यांची मैत्री सुंदररित्या दिसून आली. इतकंच नाही तर या सिनेमाच्या टीममध्ये रिंकू आणि शिवानी सुर्वे या दोघी नवीन असूनही सगळ्यांनी त्यांना छान कम्फर्टेबल केलं.

"हा चित्रपट बनवताना आम्ही इतकी मज्जा केली.. इतकी मज्जा केली.. की..धुडूऽऽऽम!! घेऊन आलो आहोत आपल्या ‘झिम्मा २’ चे मेकिंग!", असं कॅप्शन देत रिंकीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, या सिनेमात सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे, निर्मिती सावंत आणि सायली संजीव या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आला आहे.

Web Title: marathi movie jhimma 2 making video share by rinku rajguru