"पहिल्याच भेटीत त्याने...", वर्षा उसगांवकरांनी सांगितला अनिल कपूरबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:24 IST2025-09-30T17:20:21+5:302025-09-30T17:24:27+5:30
वर्षा उसगांवकर यांनी सांगितला अनिल कपूरसोबत 'हमाल दे धमाल' मध्ये काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या...

"पहिल्याच भेटीत त्याने...", वर्षा उसगांवकरांनी सांगितला अनिल कपूरबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या...
Varsha Usgaonkar : मराठी सिनेविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आपल्या आजवरच्या अभिनय कारकिर्दीत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.उत्तमोत्तम चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम करत अनेक वर्ष त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. इतकंच नाहीतर त्यांनी बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांबरोबरही एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हमाल दे धमाल या चित्रपटात काम अनिल कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
दरम्यान, पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित 'हमाल दे धमाल' या चित्रपटात अनिल कपूरने कॅमिओ केला होता. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेंची एका हमाल पासून सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास, त्याला हिमतीने मोठं करणाऱ्या वर्षा उसगावकर यांची ग्लॅमरस भूमिका होती. तसेच रविंद्र बेर्डे, सुधीर जोशी, निळू फुले, अशोक शिंदे या कलाकारांची देखील भूमिका होती. नुकतीच वर्षा उसगांवकर यांनी 'मटा मनोरंजन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना अनिल कपूरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या,"पहिल्याच भेटीत अनिल कपूरने हस्तांदोलन केलं आणि तो म्हणाला,'हॅलो मी अनिल कपूर आहे आणि तु वर्षा आहेस ना...'त्याचं ते बोलणं ऐकून वाटलं मला छान वाटलं. थोडं अवघडल्यासारखं वाटतं होतं कारण एवढा मोठा स्टार आणि आपण त्याच्यासोबत कसं बोलणार. पण, तो आमच्यामध्ये छान रमला.त्याने आमच्यासोबत लंच केला आणि पूर्ण दिवस तो आमच्यासोबत होता. अजिबात असं जाणवलं नाही की तो मोठा स्टार आहे."
एका सिनेमाचा किस्सा शेअर करत त्या म्हणाल्या...
या मुलाखतीत वर्षा उसगांवकर बॉलिवूड सिनेमाचा किस्सा सांगताना म्हणाल्या,"मी शिकारी नावाचा हिंदी चित्रपट केला होत. त्यावेळी मी अनिल कपूरबरोबर उज्बेकिस्तानला गेले होते. तेव्हा अनिल आला होता कारण त्याने पण अशाच इंडो-रशियन चित्रपटामध्ये काम केलं होतं. त्यादरम्यान, फ्लाईटमध्ये आणि तिथे अनिल आणि मी सोबत होतो. त्यावेळी देखील त्याने मुद्दामहून हमाल दे धमाल चित्रपटाच्या आठवणी काढल्या. ते पाहून मला खूप छान वाटलं. अशा गोड आठवणी वर्षा यांनी शेअर केल्या.