माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता! उर्मिला कोठारेने सांगितली अपघाताची Inside Story, म्हणाली- "मी बेशुद्ध पडले आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 13:32 IST2025-01-10T13:30:30+5:302025-01-10T13:32:42+5:30

अभिनेत्री उर्मिला कोठारे कार अपघातानंतर सुखरुप घरी परतली, पोस्ट शेअर करत दिली हेल्थ अपडेट 

marathi cinema actress urmila kothare returned home safely after the car accident shared post on social media  | माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता! उर्मिला कोठारेने सांगितली अपघाताची Inside Story, म्हणाली- "मी बेशुद्ध पडले आणि..."

माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता! उर्मिला कोठारेने सांगितली अपघाताची Inside Story, म्हणाली- "मी बेशुद्ध पडले आणि..."

Urmila Kothare: अगदी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या (Urmila Kothare) कारचा अपघात (Accident) झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मुंबईतील कांदिवलीमधील मेट्रो स्थानकाजवळ अभिनेत्रीच्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात उर्मिला स्वतः आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाले होते. सुदैवाने गाडीतील एअर बॅग्समुळे अभिनेत्री थोडक्यात बचावली. त्यानंतर तातडीने अभिनेत्रीसह तिच्या ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या गंभीर अपघातानंतर आता उर्मिला कोठारे सुखरुप घरी परतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्रीने याबद्दल चाहत्यांनी माहिती दिली आहे. 


उर्मिलाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून तिच्या तब्बेतीबद्दल अपडेट दिली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटलंय की, "२८ डिसेंबर २०२४ या दिवशी रात्री १२.४५ च्या सुमारास माझ्या कारचा अपघात झाला. पोईसर येथील मेट्रो स्थानकाजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा अपघात घडला. त्या ठिकाणी रात्री मेट्रोचं काही काम केलं जात होतं आणि त्यासाठी मोठी यंत्रसामग्री आणि एका जेसीबीद्वारे खोदकाम करण्याचं काम चालू होतं. त्या ठिकाणी रस्त्यावर जेसीबी पार्क केलेले होते. त्यादरम्यान माझा ड्रायव्हर कार चालवत होता आणि त्याला समोरचं वळण न दिसल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो. सुदैवाने, आम्हाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं."

पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "मी मुंबई पोलीस आणि पवन शिंदे यांची मनापासून आभारी आहे. कारण त्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने आम्हाला रुग्णालयात दाखल केलं. आता मी घरी सुखरुप परतली आहे. माझ्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे आणि मला डॉक्टरांनी किमान ४ आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे. बाप्पाने या सगळ्यातून सुखरुप बाहेर काढलं. त्यासोबतच माझ्या सर्व चाहत्यांचे आणि मी हितचिंतकांची आभारी आहे जे काळजीत होते आणि मी लवकर बरी होण्यासाठी ते प्रार्थना करते होते. हा एक गंभीर अपघात होता आणि पोलिसांनी माझ्या ड्रायव्हरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे की सत्याचा विजय होईल.

Web Title: marathi cinema actress urmila kothare returned home safely after the car accident shared post on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.