"माझं त्या व्यक्तीवर किती प्रेम…", सई ताम्हणकरने सांगितली प्रेमाची व्याख्या, म्हणाली-"एकत्र असून पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:31 IST2025-11-06T13:28:07+5:302025-11-06T13:31:36+5:30
सई ताम्हणकरने सांगितली प्रेमाची व्याख्या, म्हणाली-" त्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण काय करतो..."

"माझं त्या व्यक्तीवर किती प्रेम…", सई ताम्हणकरने सांगितली प्रेमाची व्याख्या, म्हणाली-"एकत्र असून पण..."
Sai Tamhanakar: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर हे इंडस्ट्रीतील नावाजलेलं नाव आहे. आपल्या अभिनयसामर्थ्याने रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची तिने मने जिंकली. सईने आजवर अनेक चित्रपट, वेब सीरीज यांमध्ये झळकली आहे. तिचा जगभरात चाहतावर्ग आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या सौंदर्याला तर अजिबातच तोड नाही. सध्या सई एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने प्रेमाची परिभाषा सांगितली आहे.
अलिकडेच सईने 'अमुक तमुक' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की,प्रेमात अनेक टप्पे असतात.तुम्ही विशीत असताना त्या व्यक्तीने तुमच्यावर जीव ओवाळून टाकावा असं वाटत असतं. मग हळूहळू तिशीत गेल्यानंतर वाटतं, तू तूझा वेळ घे... मला माझी स्पेस दे! असं तुझ्याबाबतीत झालं का? कारण सध्या सई ज्या स्टेजला मध्ये आहे,त्यावेळी तू प्रेमाकडे कशी बघते.यावर सई म्हणाली, "मला असं वाटतं की, मी जर कोणाच्या प्रेमात असेन तर मी त्याच्या अनुपस्थितीत काय करते, यावरून माझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे कळतं. किंवा ती व्यक्ती माझ्याबरोबर नसताना पण माझ्याबरोबर कशी आहे, यावरून एकमेकांवरील प्रेम दिसतं."
यानंतर अभिनेत्री असंही म्हणाली," एक उदारण घ्यायचं झालं तर, माझं एका व्यक्तीवर प्रेम आहे आणि मी एका कुठल्यातरी स्पेशल ठिकाणी गेले आहे. तर मला असं वाटत राहतं की ती व्यक्ती माझ्याबरोबर आहे. माझ्यासाठी हे प्रेम आहे, हीच प्रेमाची व्याख्या आहे. माझ्यासाठी आम्ही एकत्र असून पण मी माझं वेगळेपण जपते आहे आणि त्याला पण तेवढंच खतपाणी देते आहे,हे माझ्यासाठी प्रेम आहे. पण, त्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण काय करतो हे सुद्धा माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे." असं स्पष्ट मत अभिनेत्रीने व्यक्त केलं.