VIDEO: वाढदिवसानिमित्त अभिनेत्री प्रार्थना बेहरेने गाठलं शिर्डी; साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:44 IST2025-01-06T15:42:46+5:302025-01-06T15:44:57+5:30
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्री प्रार्थना बेहरे शिर्डीला पोहोचली, याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

VIDEO: वाढदिवसानिमित्त अभिनेत्री प्रार्थना बेहरेने गाठलं शिर्डी; साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक
Prarthana Behere : प्रार्थना बेहरे (Prathana Behere) या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. मितवा, कॉफी आणि बरंच काही या चित्रपटांमुळे अभिनेत्री घराघरात पोहोचली. पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेतही ती झळकली आहे. शिवाय प्रार्थनाचा माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. शिवाय प्रार्थना बेहरेसोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या प्रोजेक्टसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांसोबत सुद्धा शेअर करत असते. दरम्यान, काल ५ जानेवारीच्या दिवशी प्रार्थनाचा वाढदिवस होता. यानिमित्ताने अभिनेत्रीने शिर्डीला जाऊन साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाली.
प्रार्थना बेहरेने आपला वाढदिवसाच्या दिवशी नवऱ्यासह शिर्डीला जाऊन अभिनेत्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाली. सोशल मीडियावर तिने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिच्या निर्णयाचं कौतुक करत लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. शिवाय "वाढदिवस उत्तम पद्धतीने साजरा केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज साक्षात् परब्रह्म श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय..!" असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
वर्कफ्रंट
प्रार्थना बेहरेने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले. 'कॉफी आणि बरंच काही', 'मितवा', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'फुगे', 'व्हॉट्स अप लग्न', 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' अशा अनेक चित्रपटात प्रार्थना मुख्य भूमिकेत दिसली.