"१९-२० वर्षांच्या मुलांनी माझा व्हिडीओ…", सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल प्राजक्ता माळीचं वक्तव्य, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:56 IST2025-09-26T16:49:58+5:302025-09-26T16:56:55+5:30
सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल प्राजक्ता माळीचं स्पष्ट मत,म्हणाली- "काहीही टाकायचं म्हणून..."

"१९-२० वर्षांच्या मुलांनी माझा व्हिडीओ…", सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल प्राजक्ता माळीचं वक्तव्य, म्हणाली...
Prajakata Mali: प्राजक्ता माळी हे नाव सध्याच्या घडीला मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणलं जातं. वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपट तसंच रिअॅलिटी शोमधून प्राजक्ताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. प्राजक्ता तिच्या अभिनयासह, नृत्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलाखतीत तिने सोशल मीडियाबाबत तिचं मत मांडलं आहे.
नुकतीच प्राजक्ता माळीने 'MHJ Unplugged' सोबत संवाद साधला. त्यादरम्यान तिला प्राजक्ता माळी सध्याच्या काळात समाज माध्यमांकडे कशी पाहते. असं प्रश्न विचारला गेला. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, "मला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची भीती वाटली नव्हती पण आता मला सोशल मीडियाची भीती वाटते. मला एकदा सायब्रर क्राईम महासंचालकांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा तर त्यांनी मला एका वेगळ्याच गोष्टीची माहिती दिली. त्याच सायबर पोलिसांनी दोन मुलांना पकडलं होतं त्याचं वय साधारण १९-२० वर्ष होतं. ज्यांना माहितच नव्हतं की ते आयुष्यात काय करत आहेत. त्यातील एकाला मला त्यांनी फोन लावून दिला. तर त्याला मी विचारलं की तू असं का केलंस. त्याने एक प्रोफाईल उघडलं होतं. त्याच्यामध्ये फक्त माझे खराब व्हिडीओ होते. त्यावर मी त्याला विचारलं की तू हे का केलंस? तर त्याचं उत्तर असं होतं की, 'तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होता म्हणून मी केलं'. खरंतर तो माझा चाहता होता. काहीही टाकायचं म्हणून त्याने ते टाकलं होतं. शिवाय त्याला हेही कळतं नव्हतं की त्याने काय केलंय. त्यावेळी मला विनंती करत तो मुलगा म्हणाला, 'कृपया माझ्या घरी हे सांगू नका, कारण माझे वडील मला चाबकाने मारतील'. ही शेवटची विनंती त्याने मला केली होती."
सोशल मीडियाबाबत प्राजक्ता काय म्हणाली...
"तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर करु नका. मी देखील हे करत नाही. मला ती गोष्ट फार आवडते, ज्यामध्ये एक मोठा हत्ती आहे आणि चार माणसं असतात. जसं एकाच्या हातात शेपूट आलं. एकाच्या हातात सोंड आली तर तिसऱ्याच्या हातात पाय आला, अशी परिस्थिती आहे. आपल्याला खरं सत्य आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. आपल्याला पूर्ण चित्र माहितच नसतं. शिवाय जे काही आपल्या हाताला लागतं त्यावरच आपण बोलत असतो, म्हणून सावधगिरी बाळगा." असं मत अभिनेत्रीने मुलाखतीत व्यक्त केलं.