मधुरा वेलणकर सध्या मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? अभिनेत्री म्हणाली- "लॉकडाऊनच्या काळात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:58 IST2025-04-08T13:57:09+5:302025-04-08T13:58:50+5:30

"कलाकार दिसत नसला तर तरी तो त्याच्या कलेवर...", अभिनेत्री मधुरा वेलणकरने व्यक्त केली खंत, म्हणाली...

marathi cinema actress madhura velankar talk about not appearing in marathi films and serials says | मधुरा वेलणकर सध्या मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? अभिनेत्री म्हणाली- "लॉकडाऊनच्या काळात..."

मधुरा वेलणकर सध्या मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? अभिनेत्री म्हणाली- "लॉकडाऊनच्या काळात..."

Madhura Velanklar:मधुरा वेलणकर (Madhura Velanklar) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री 'हापूस', 'एक डाव धोबीपछाड', 'गोजिरी' अशा चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मराठी मालिकांमध्येही तिने अभिनयाचा ठसा उमटवला. मधुराचं माहेर आणि सासर दोन्हीही मनोरंजनसृष्टीशी निगडित आहे. तिचे वडील तर अभिनेते आहेतच शिवाय तिचे सासरे हे सीआयडी फेम अभिनेते शिवाजी साटम आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मधुरा वेलणकरने तिच्या अभिनय क्षेत्रातील काही अनुभव शेअर केले.

मधुरा वेलणकरने नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यामध्ये अभिनेत्री म्हणाली, "या क्षेत्रामध्ये यश जसं पटकन मिळतं तसं अपयशही येतं. असं होऊ शकतं की एक-दीड वर्ष तुम्ही खूप काम करता आणि अचानक दोन महिने आपल्याकडे काम नाही आहे. तर त्याची आर्थिकदृष्ट्या तजबीज आपण केलेली असते. पण, आजकाल लोकांची मेमरी इतकी कमी असते की लगेच लोक असं विचारतात की, काय तुम्ही आता काही काम करत नाही वाटतं? मला नेहमी असं वाटतं कलाकार दिसत नसला तर तरी तो त्याच्या कलेवर काम करत असतो. पण, प्रेक्षकवर्ग असा आहे की त्यांना हे एक वाक्य पटकन म्हणणं फार सोपं असतं. ही गोष्ट आपल्या मनाला लागू शकते. इतकी वर्षे मी काम करतेय आणि एखादं वर्ष मालिका नाही केली म्हणजे कामच करत नाही असं नसतं."

यानंतर अभिनेत्रीने सांगितलं, "मी गेली ५ वर्ष माझा मुलगा झाल्यापासून सिनेमांमध्ये काम केलं नाही. पण मी नाटक करत होते. याशिवाय दोन समित्यांवर काम करत होते. त्याच्यानंतर मी एक पुस्तक लिहिलं. तसंच लॉकडाउनच्या काळामध्ये ऑनलाईन कार्यक्रम करत होते. पण, मी मालिकेत दिसत नव्हते. आजकाल असं असतं तुम्ही मालिकेत दिसत आहात म्हणजे तुम्ही काम करताय असा लोकांचा समज आहे."

प्रेक्षकांना म्हणाली...

पुढे मधुरा वेलणकर म्हणाली, "मला वाटतं प्रेक्षकांची सुद्धा एक जबाबदारी असते. जसं तुम्ही अपेक्षा करता की कलाकाराने पूर्ण तयारीनिशी उतरावं. तसं प्रेक्षक म्हणून तुम्ही काय तयारी करुन येता. तुम्हाला माहीत असतं का आपण काय बघायला जातोय. ते कोणी लिहिलंय ते लिहिणारे कोण आहेत. त्याचबरोबर या कलाकारांनी काय काम केलंय. आपण फक्त तिकीट काढतो, जातो आणि नावं ठेवून येतो." 

Web Title: marathi cinema actress madhura velankar talk about not appearing in marathi films and serials says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.