'एप्रिल मे ९९' सिनेमा कसा वाटला? अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने शेअर केली पोस्ट, म्हणाली-"श्रीवर्धनचं सौंदर्य..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:34 IST2025-05-28T14:27:37+5:302025-05-28T14:34:49+5:30
सध्या मराठी मनोरंजनविश्वात रोहन मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे ९९' या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.

'एप्रिल मे ९९' सिनेमा कसा वाटला? अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने शेअर केली पोस्ट, म्हणाली-"श्रीवर्धनचं सौंदर्य..."
Bhagyashree Milind : सध्या मराठी मनोरंजनविश्वात रोहन मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे ९९' या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. उन्हाळ्याची सुट्टी आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करुन देणारा हा चित्रपट २३ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्याचबरोबर सर्वत्र या चित्रपटाचं कौतुक होत आहे. अशातच मराठी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने देखील 'एप्रिल मे ९९' सिनेमा पाहून आपल्या भावना व्यक्त करत खास पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री भाग्यश्री मिलींद सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. त्या माध्यमातून भाग्यश्री तिच्या वैयक्तिक आयुष्यासह अनेक महत्वाच्या अपडेट्स शेअर करत असते. सध्या अभिनेत्रीने अलिकडेच प्रदर्शित झालेल्या एप्रिल मे ९९ सिनेमा तिला कसा वाटला याबद्दल पोस्ट लिहून तिचं मत मांडलं आहे. सोशल मीडियावर शेअर या पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटलंय, "साधारण एक आठवडा उलटून गेला ही film बघून , ह्या film ने मनात घर केलंय. Film चा गोडवा आठवून चेहऱ्यावर एक smile येते. @rohanmapuskar @mapuskar एखादं छान पुस्तक आपल्यासमोर अतिशय cinematic पद्धतीने उलगडत जावं असा ह्या सिनेमाचा feel आहे. एक उन्हाळ्याची सुट्टी, अत्यंत साधी आणि खरंखुरी माणसं, त्यांच्या रोजच्या जगण्यातले क्षण, त्यांचे एकमेकांसोबतचे अनुभव, श्रीवर्धनचं सौंदर्य हया सगळ्या गोष्टी सुरेखपणे टिपल्या आहेत हे छोटे छोटे क्षण सिनेमा साजरा करतो. रोहन मापुस्कर दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा जरी असला तरी सिनेमा मनापासून आणि प्रेमाने केलाय हे प्रत्येक Frame मध्ये जाणवतं.त्यामुळेच तो भिडतो."
त्यानंतर अभिनेत्रीने अपूर्वा शालिग्राम यांना टॅग करत लिहिलंय, "श्रीवर्धनचं सौंदर्य टीपण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. आनंदी गोपाळ मध्ये asst. DOP म्हणून तुला पाहिलं होतं. आता DOP म्हणून तुझं नाव बघून छान वाटलं. आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, साजिरी जोशी अख्खी film खांद्यावर पेलवलीत, खूप सहज वावरलात. प्रेमात पाडलंत. एप्रिल में ९९ जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा... अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे.
मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. या चित्रपटात आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.