बाप रे! 'आता थांबायचं नाय'च्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ जाधवला गमवावा लागला असता डोळा; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:27 IST2025-04-28T12:25:12+5:302025-04-28T12:27:41+5:30

'आता थांबायचं नाय'च्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ जाधवचा झाला असता अपघात; काय घडलं? 

marathi cinema actor siddharth jadhav talk in interview about horrible shooting scene in ata thambaycha nay movie what happened | बाप रे! 'आता थांबायचं नाय'च्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ जाधवला गमवावा लागला असता डोळा; काय घडलं?

बाप रे! 'आता थांबायचं नाय'च्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ जाधवला गमवावा लागला असता डोळा; काय घडलं?

Siddharth Jadhav: मराठीसह हिंदी कलाविश्वात दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). सिद्धार्थ जाधवने त्याच्या अभिनय कारकिर्दीत आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या तो आता थांबायचं नाय या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. हा चित्रपट येत्या १ मे २०२५ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव मारुतीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय. अशाच एका मुलाखती दरम्यान अभिनेत्याने आता थांबायचं नाय च्या शूटिंद दरम्यानचा थरारक प्रसंगाविषयी सांगितलं आहे. 

नुकतीच 'आता थांबायचं नाय' च्या टीमने 'न्यूज १८ लोकमत' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सिद्धार्थ जाधवने शूटिंद दरम्यान, आपल्याला एका चुकीमुळे डोळा गमवावा लागला असता असा धक्कादायक खुलासा केला. त्याबद्दल सांगताना अभिनेता म्हणाला, "खरंतर, जीवाची पर्वा न करता काम करणारी ही मंडळी असतात. या चित्रपटात एक सीक्वेंस आहे ज्यामध्ये फुटलेल्या पाईपमधून पाणी फोर्सने बाहेर येत असतं. ते सगळं मला नीट करायचं होतं. मी पहिल्यांदाच ही गोष्ट सांगत आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच की, अपघात कसे  होऊ शकतात. पण, ही मंडळी लोकांसाठी कशी तत्पर असते, तो पाईप फुटलेला असतो आणि मारुती कदम येतो आणि तो दुरुस्त करतो. हा सीन करताना मला काही अंदाज नव्हता आणि मला तो सी करायचा होता. त्यादरम्यान, पाण्याचा फोर्स डोळ्याच्या वरच्या भागाला लागून गेला. तेव्हा नक्की काय घडलं मला देखील माहित नव्हतं. त्यानंतर आम्ही आणखी एक सीन शूट केला. पण, तेव्हा त्या फोर्समुळे कदाचित मला डोळा गमवावा लागला असता."

त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला, "त्यानंतर मला त्याची तीव्रता जाणवली की,शूटिंग आहे म्हणून इतका पाण्याचा फोर्स आहे. पण, जेव्हा ही खरंच पाण्याचा असा काही प्रॉब्लेम असेल तेव्हा ही कर्मचारी मंडळी काय करत असेल? काय डोकं लावत असतील? असं असूनही ते प्रामाणिकपणे आपलं काम करतात. नित्यनियमाप्रमाणे आपल्या दिलेलं ते काम आहे या भावनेने ते काम करत असतात." त्या दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांचं कौतुक करत अभिनेता या प्रसंगाबद्दल सांगितलं. 

दरम्यान, आता थांबायचं नाय चित्रपटात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवसह आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीणकुमार डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. झी स्टुडिओज् प्रस्तुत , झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले,अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केले आहे. गुलराज सिंग यांचं धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभले आहे.  चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी व धरम वालिया यांनी केली आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव प्रोड्यूसर आहेत. येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: marathi cinema actor siddharth jadhav talk in interview about horrible shooting scene in ata thambaycha nay movie what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.