आई-बाबांसाठी खास गिफ्ट, मराठी अभिनेत्याने पालकांसाठी खरेदी केली नवीन गाडी! म्हणाला-" सुख म्हणजे काय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 11:56 IST2025-12-05T11:53:41+5:302025-12-05T11:56:14+5:30
मराठमोठ्या अभिनेत्याने आई-वडिलांना भेट दिली नवीकोरी गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

आई-बाबांसाठी खास गिफ्ट, मराठी अभिनेत्याने पालकांसाठी खरेदी केली नवीन गाडी! म्हणाला-" सुख म्हणजे काय..."
Santosh Juvekar Video: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे संतोष जुवेकर.काही दिवसांपूर्वी तो 'छावा' चित्रपटामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. सध्या रंगभूमीवर त्याचं घासीराम कोतवाल हे नाटक जोरदार सुरु आहे. त्यात आता अभिनेता एका वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरलाय. संतोष जुवेकरने त्याच्या आई वडिलांसाठी एक खास गोष्ट केलीये ज्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या आई-बाबांसाठी गाडी खरेदी केली आहे. Hyundai Aura ब्रँडची तब्बल ८ लाख किंमतीची गाडी खरेदी केली."सुख म्हणजे नक्की काय असतं,काय असत पुण्य की जे..... ह्यांच्या डोळ्यात दिसतं, आई बाबा i love u alottt...", असं सुंदर कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.आई-बाबांना हे सुंदर गिफ्ट म्हणून दिल्याबद्दल सध्या मराठी कलाविश्वातून शुभंकरवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेकांनी "मुलगा असावा तर असा...",
असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
लेकाने नवीन गाडी घेतल्यामुळे त्याचे आई-बाबा देखील व्हिडीओमध्ये प्रचंड खुश असल्याचे पाहायला मिळत आहेत. संतोष जुवेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने 'झेंडा', 'रेगे', 'मोरया', 'रानटी', 'एक तारा', 'अस्सं सासर सुरेख बाई', 'वादळवाट', 'या गोजिरवाण्या घरात' अशा चित्रपट व मालिकांमधून काम करत त्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.