"स्त्रीकडून पुरुषाला अपेक्षित असतं की तिने....", हेमंत ढोमे नेमकं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:28 IST2025-01-21T16:22:55+5:302025-01-21T16:28:28+5:30

हेमंत ढोमे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

marathi cinema actor hemant dhome reveals in interview about relationship says | "स्त्रीकडून पुरुषाला अपेक्षित असतं की तिने....", हेमंत ढोमे नेमकं काय म्हणाला?

"स्त्रीकडून पुरुषाला अपेक्षित असतं की तिने....", हेमंत ढोमे नेमकं काय म्हणाला?

Hemant Dhome:  हेमंत ढोमे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. (Hemant Dhome) अभिनयासह दिग्दर्शन क्षेत्रात देखील तो सक्रिय आहे. वेगवेगळी नाटक, चित्रपट अशा सगळ्या माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे. हेमंत ढोमे कायमच त्याच्या बेधडक, स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असतो. सध्या मराठी मनोरंजनविश्वात 'फसक्लास दाभाडे' या त्याच्या सिनेमाबद्दल चर्चा सुरु आहे. नव्या वर्षात हेमंत नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मुलाखती देत आहे. 


नुकतीच हेमंत ढोमेने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये हेमंत आणि क्षिती जोगला रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अभिनेत्याने सांगितलं, "प्रत्येक पुरुषाला ना आई हवी असते. रिलेशनशिपमध्ये कुठल्याही स्त्रीकडून त्याला हे अपेक्षित असतं की, तिने त्याला आईसारखं समजून घ्यावं, आईसारखं सांभाळावं. कारण पुरुषाला लहानपणापासून आई आणि लग्नानंतर बायको या दोनच व्यक्ती अशा असतात ज्या सांभाळू शकतात." हे गुण आपल्या लाईफ पार्टनरमध्ये दिसले आणि आपण लग्न केलं, असा खुलासा अभिनेत्याने या मुलाखतीमध्ये केला. 

हेमंतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत 'पोस्टर गर्ल', 'बघतोस काय मुजरा कर', 'झिम्मा', 'झिम्मा २' यांसारखे दर्जेदार चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. फसक्लास दाभाडे' या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: marathi cinema actor hemant dhome reveals in interview about relationship says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.