"थांब म्हटलं की थांबायचं...", अंकुश चौधरीच्या 'पी.एस.आय. अर्जुन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:01 IST2025-05-03T16:00:12+5:302025-05-03T16:01:40+5:30
त्याची वर्दी म्हणजे इशारा! अर्जुन आलाय आता राडा होणार; 'पी.एस.आय. अर्जुन' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

"थांब म्हटलं की थांबायचं...", अंकुश चौधरीच्या 'पी.एस.आय. अर्जुन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
P.S.I. Arjun Movie Trailer: अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनेता त्याच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. लवकरच अभिनेता नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पी.एस.आय. अर्जुन' असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटानंतर दोन वर्षांनी अंकुश प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. अलिकडेच या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यानंतर आता 'पी.एस.आय. अर्जुन' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
नुकताच सोशल मीडियावर 'पी.एस.आय. अर्जुन' चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. "लोड तुम्ही घेऊ नका,विषय पुढे नेऊ नका, चॅलेंज अर्जुनला देऊ नका, दिलं तर मग भिऊ नका..! "पी. एस. आय. अर्जुन "चा धमाकेदार ट्रेलर आलाय..! पी. एस.आय.अर्जुन'९ मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! "थांब म्हटलं की थांबायचं..!" असं कॅप्शन देत या ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
या ट्रेलरमध्ये सुरुवातीला छबीनाथ म्हणजेच छब्या नावाच्या एका चोराच्या संवादाने होते. याच छब्याची मदत घेऊन अंकुश पोलिसांपासून स्वत: चा बचाव करतो. त्या चोराचा शोध लावण्यासाठी पोलिसांची कशी धडपड होते. पुढे पोलिसांची गाडी पाहायला मिळते. अंकुश चौधरीचा आवाज ऐकायला येतो. अखेरीस अंकुश चौधरी चोराला पकडण्याचा निश्चय करतो. अशी दोन विरोधाभास असलेली अंकुशची पात्रे यामध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री अक्षया हिंदळकरची सुद्धा यामध्ये झलक पाहायला मिळते. या चित्रपटातील अंकुश चौधरीचा लूक पाहून प्रेक्षक सुखावले आहेत.
व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित 'पी.एस.आय.अर्जुन'चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत. तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी 'पी. एस. आय. अर्जुन' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.