"तुला जाऊन इतकी वर्ष...", वंदना गुप्तेंनी आईच्या आठवणीत शेअर केली भावुक पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 13:14 IST2025-05-16T13:07:34+5:302025-05-16T13:14:52+5:30

अभिनेत्री वंदना गुप्तेंनी आईच्या आठवणीत शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाल्या...

marathi actress vandana gupte shared an emotional post on social media in memory of her mother  | "तुला जाऊन इतकी वर्ष...", वंदना गुप्तेंनी आईच्या आठवणीत शेअर केली भावुक पोस्ट 

"तुला जाऊन इतकी वर्ष...", वंदना गुप्तेंनी आईच्या आठवणीत शेअर केली भावुक पोस्ट 

Vandana Gupte: मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांना ओळखलं जातं. विविध नाटके, मालिका आणि धाटणीच्या चित्रपटांमधून त्यांनी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.  उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या वंदना त्यांच्या दिलखुलास आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी सुद्धा ओळखल्या जातात. अशातच अभिनेत्रीने आपल्या आईसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. आज वंदना गुप्तेंच्या आईचा वाढदिवस असून, आपल्या आईच्या आठवणीत एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. या फोटोसह त्यांनी एक भावूक पोस्टदेखील लिहिली आहे.


वंदना गुप्ते यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर आईच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय, "मम्मी, काय बोलू..? तुझ्या आठवणी शिवाय एकही दिवस नाही गेला. तुला जाऊन इतकी वर्ष झाली हे खरंच नाही वाटत. तुझी उणीव, हीच तू सभोवताली असण्याची जाणीव!! आम्हीच नाही तर अख्खा महाराष्ट्र अजूनही तुझ्या लडिवाळ स्वरांमध्ये झोके घेत असतो. तुझं ‘स्वर शताब्दी वर्ष’ साजरे करण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत पण तुझा संगीताचा प्रवास एवढा मोठा आहे की आम्ही कमीच पडणार हे नक्की. तुझ्या आयुष्याचे प्रवास वर्णन करणारे ‘माणिक मोती‘ हे पुस्तक आणि तुझ्या करियर चे वर्णन करणारा ‘माणिक मोती हा ऑडिओ, व्हिडिओ, musical क्लासिक karyakram’, शिवाय हसले मनी चांदणे हा musicle शो असे अनेक shows करणार आहोत.तुम्ही दोघांनी वरून सगळे कार्यक्रम बघा. तुमचे उत्तम संस्कार आम्हाला योग्य दिशा दाखवतातच, असेच भरभरून आशीर्वाद द्या!"

त्यानंतर वंदना गुप्तेंनी पुढे लिहिलंय, "तुमच्या प्रेमाची सावली अशीच राहुदे म्हणजे आमचा पुढचा खडतर प्रवास सुखकारक होईल. मम्मी, आज तुझा १०० वा वाढदिवस! मम्मी तुला १०० वेळा शुभेच्छा आणि दोघांनाही खूप प्रेम आणि वाकून नमस्कार —तुमच्या मुली भारती, अरुणा, वंदना, राणीआई तुझी आठवण येते, सुखद स्मृतींच्या, कल्लोळाने काळीज का जळते?" अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

वंदना गुप्ते यांच्या आई माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्या घरात कलाक्षेत्राशी निगडीत वातावरण होतं. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वंदना गुप्ते यांनी तीन वर्ष गाण्याच प्रशिक्षण घेतलं होतं. पण त्यांना त्यात फारसा रस नव्हता.

Web Title: marathi actress vandana gupte shared an emotional post on social media in memory of her mother 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.