"मला काम करताना मरण आलं पाहिजे, कारण...", भावुक झाल्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझ्यामुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:18 IST2025-06-06T13:18:02+5:302025-06-06T13:18:18+5:30
अनेक मालिका, सिनेमांमधून उषा नाडकर्णी यांनी अभिनयाची छाप पाडली. मराठीसोबत त्यांनी हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीदेखील गाजवली. उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काम करताना मरण यावं असं म्हटलं आहे.

"मला काम करताना मरण आलं पाहिजे, कारण...", भावुक झाल्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझ्यामुळे..."
फार मोजके कलाकार आहेत ज्यांच्या निगेटिव्ह भूमिकाही प्रचंड गाजल्या. उषा नाडकर्णी यांनादेखील प्रेक्षकांनी खलनायिका आणि खट्याळ सासूच्या भूमिकेतच पाहणं जास्त पसंत केलं. याशिवायही त्यांनी अनेक ताकदीच्या भूमिका साकारल्या. अनेक मालिका, सिनेमांमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. मराठीसोबत त्यांनी हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीदेखील गाजवली. उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काम करताना मरण यावं असं म्हटलं आहे.
उषा नाडकर्णी यांनी नुकतीच 'आम्ही असं ऐकलंय' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "माझं म्हणणं आहे की काम करताना मला मरण आलं पाहिजे, मज्जा येईल. आपल्यासाठी कोणी त्रास घ्यायला नको. आपल्याला बघून लोकांना वाईट वाटायला नको. आणि लोक आपल्यासाठी करतात हे बघून मला वाईट वाटायला नको. म्हणजे मी आजारी पडले तर माझ्या मुलाला त्रास होणार. तो त्याच्या बायको मुलीला बघणार की मला बघणार? माझ्या बाजूला एक बंगाली कुटुंब राहतं. त्यांनी मला सांगितलं की आंटी काहीही झालं तरी सांगायला लाजू नका, मध्यरात्रीदेखील फोन करा".
७९ वर्षांच्या उषा नाडकर्णी या मुंबईत एकट्या राहतात. काही दिवसांपूर्वीच त्या अंकिता लोखंडे आणि विकी जैनकडे एका पार्टीच्या निमित्ताने गेल्या होत्या. तेव्हा अंकिता आणि विकीजवळ उषा नाडकर्णी यांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलं होतं. "मी घरी एकटी आहे, मला भीती वाटते की मी पडेन आणि कोणालाही कळणार नाही", असं त्या म्हणाल्या होत्या.